नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल रेल्वे स्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि कामांचा आढावा घेतला.

यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपीळे, युवामोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमीत झुंझारराव, स्टेशन मास्तर कृष्णा अग्रवाल, आर. के. नायर, शिवाजी भोसले, अशोक आंबेकर, जरीना शेख, कविता गुप्ता, रविंद्र फास्टे उपस्थित होते.

पनवेल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास अमृत भारत स्टेशन योजना (एबीएसएस) अंतर्गत केला जात आहे. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे.

पनवेल स्थानकाचा विकास या योजनेचा एक भाग असून प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा मिळाल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी करत सुचनाही संबधित अधिकाऱ्यांना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top