4k समाचार दि, 11
पनवेल (प्रतिनिधी) धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वपुर्ण झाले आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सायकल साहस मोहिमेच्या शुभारंभावेळी केले. तसेच या महिमेमुळे इतरांनाही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरणा मिळेल असे सांगीतले.

सायकलींच्या माध्यमातून आरोग्य, निसर्ग संवर्धन आणि इंधन बचतीबाबात जनजागृतील निर्माण करण्यासाठी राजकिशोरी लांगे यांच्यावतीने पनवेल ते दुर्गराज रायगड सायकल मोहिम १० आणि ११ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे माजी सभागृगहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी त्यांनीही सायकलींग करुन मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी राजकिशोरी लांडगे, राजेश देशपांडे, रंगनाथ मुगळिहाळ, विवेक आपटे, सोनल भोमे, अमोल समुद्र, चंद्रशेखर कमल, विष्णू जगताप, मंगल भानुशाली, भुजंग लोखंडे, लक्ष्मण नलावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
