Tag: #Kamothe #Panvel

नागपंचमीनिमित्त ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ जनजागृती

4kNews कामोठे उरण दि. 18 (विठ्ठल ममताबादे) : नागपंचमीनिमित्त सर्पांविषयीचे समज-गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती करण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर-उरण यांच्या वतीने ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ या विषयावर तीन ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल, वाशी येथे तुषार म्हात्रे, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक […]

८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

4kNews कामोठे दि. 18आज कामोठे शहरात शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष मा. गौरव पोरवाल जी यांच्या पुढाकाराने आणि आमदार मा. बाळाराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या शहराची अहोरात्र सेवा करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.घंटागाडी कर्मचारी हा आपल्या समाजातील अत्यंत उपेक्षित आणि कष्टकरी घटक आहे. आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी आणि आपल्या सेवेसाठी ते अहोरात्र मेहनत घेत असतात. […]

मुलीला उचलल्यानंतर छातीत आली कळ; न्यूमोथोरॅक्सवर यशस्वी कीहोल शस्त्रक्रिया

4kNews कामोठे दि. 18 रोहा : केरळमध्ये कुटुंबासोबत सुट्टीवर गेलेल्या ३२ वर्षीय आसिफ शेख यांना मुलीला उचलल्यानंतर अचानक छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास झाला. सुरुवातीला स्नायूंवरील ताणामुळे त्रास झाल्याचे वाटले; मात्र तपासणीत डाव्या फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात हवा साचून न्यूमोथोरॅक्स झाल्याचे आढळले. ६ जून २०२६ रोजी ते खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.  एचआरसीटी स्कॅनमध्ये […]

ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक व पुरोहित सुधाकर ठाकूर यांचे निधन.

4kNews कामोठे उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील खोपटे बांधपाडा परिसरातील हसमुख, मनमिळावू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व कैलासवासी सुधाकर केशव ठाकूर यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.सुधाकर ठाकूर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार व शिक्षण दिले. गिरोबा देवावर त्यांची नितांत श्रद्धा होती. श्रीक्षेत्र खोपटे ग्रामदेवता गिरोबा देवाची […]

प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोटरीचा ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ प्रदान

4kNews कामोठे पनवेल दि 17  (प्रतिनिधी):भारतीय क्रिकेट जगताला रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांसारखे दिग्गज खेळाडू देणारे प्रख्यात क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ (Vocational Excellence Award 2026) देऊन गौरवण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल नितीन ढमाले आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कार […]

संगीतसाधनेचा डिजिटल स्वरमंच; रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांच्या वेबसाईटचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात अनावरण

4,kNews कामोठे दि. 17 पनवेल (प्रतिनिधी) शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपल्या सुरेल गायकीने, अखंड संगीतसाधनेने आणि समाजाभिमुख कार्याने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे रायगड भूषण पं. उमेश निवृत्तीबुवा चौधरी यांनी संगीत क्षेत्रातील आपल्या कार्याची माहिती, संगीतप्रेमींसाठी उपयुक्त साहित्य तसेच आपल्या कलाप्रवासाची ओळख करून देणारी वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या […]

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यालयात ध्वजारोहण व ध्वजवंदन

4kNews कामोठे दि. 17 देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यालयात ध्वजारोहण व ध्वजवंदन मोठ्या उत्साहात झाले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.  यावेळी ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, महापौर नितीन […]

कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

4kNews कामोठे दि 17कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने परिसर भारावून गेला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांद्वारे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी […]

हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप; स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारा उपक्रम – आमदार महेश बालदी; ‘एकही आदिवासी बांधव कुड्याच्या घरात राहणार नाही’ – आमदार महेश बालदी

4kNews कामोठे दि. 17 पनवेल (प्रतिनिधी) ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आज मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. कर्जत फाटा येथील एन. डी. स्टुडिओ येथे आयोजित […]

द्रोणागिरी नोडसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची मागणी.

उरण  दि 17 (विठ्ठल ममताबादे )सिडकोने नियोजनबद्ध पद्धतीने विकसित केलेल्या द्रोणागिरी (नोड) शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि मतदारसंख्या लक्षात घेता, द्रोणागिरी नोडसाठी स्वतंत्र मतदान केंद्र निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विविध ग्रामीण गावांच्या मतदान केंद्रांमध्ये विभागलेले द्रोणागिरी नोडचे शहरी मतदार एकत्र करून संपूर्ण द्रोणागिरी शहरासाठी स्वतंत्र मतदान केंद्र व स्वतंत्र निवडणूक व्यवस्था निर्माण […]

Back To Top