नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक

पनवेल(प्रतिनिधी) महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्‍या न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी घेतला. पाणीपुरवठ्यामध्ये येणार्‍या तुटीची भरपाई करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी योजनेचे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सूचित केले.


पनवेल महापालिकेत झालेल्या या बैठकीला प्रांताधिकारी पवन चांडक, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता रमेश वायदंडे, श्री. वेगुर्लेकर, एमएसआरडीसीचे श्री. करंजकर, मनपा उपायुक्त गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पनवेल शहर वरिष्ठ निरीक्षक पोलीस नितीन ठाकरे, खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे आदी उपस्थित होते.


   या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सूक्ष्म स्तरावर पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नांबाबत या वेळी समाधान व्यक्त करण्यात आले. योजनेच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पूर्ण सहकार्य करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले.या योजनेचे काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांचा समन्वय सुनिश्चित करण्यात आला. योजनेच्या वेळेत अंमलबजावणीसाठी उपस्थित अधिकारी आणि कंत्राटदारांनी पूर्ण बांधिलकी दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top