उरण, दि. १९ (विठ्ठल ममताबादे) : पनवेल तालुक्यातील रिटघर गावाने गेल्या ५२ वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा अखंडपणे जपली आहे. १९७४ मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजही गावकऱ्यांच्या एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे. सुमारे २१०० लोकसंख्या आणि ४०० उंबरठे असलेल्या रिटघर गावात प्रत्येक घरात स्वतंत्र गणपतीची स्थापना न करता जय हनुमान सार्वजनिक […]
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
4kNews कामोठे दि. पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या खारघर येथील ‘शिवनेरी’ महापौर निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाची आरती चाफेवाडी व फणसवाडी येथील आदिवासी वाडीतील महिला, पुरुष तसेच चिमुकल्यांच्या शुभहस्ते भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत समाजातील सर्व घटकांना उत्सवाच्या आनंदात सहभागी करून घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचा कौतुकास्पद उपक्रम महापौर नितीन पाटील यांनी राबविला. आरतीनंतर […]
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
4kNews कामोठे दि. 18 पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. […]
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
4kNews कामोठे दि. 18नवी मुंबई / पनवेल (प्रतिनिधी) भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (AERA) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुधारित व्हेरिएबल टॅरिफ प्लॅनला (Variable Tariff Plan) मंजुरी दिल्याने, या विमानतळावरील आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काला मोठी गती मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) मागणी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार, सवलतीसाठीची पात्रता “मुंबई महानगर प्रदेशातील नवीन मार्ग” ऐवजी “नवी मुंबई […]
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
4kNews कामोठे दि 18 पनवेल प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या Re Sustainability Limited च्या वतीने यंदा “पर्यावरणपूरक ग्रीन गणेशोत्सव – २०२६” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीचे संचालक सोमनाथ मलगर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या उपक्रमांतर्गत तब्बल ५,००० पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींचे मोफत वितरण करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक […]
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
4kNews कामोठे दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानीही गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सिद्धार्थ ठाकूर व त्यांच्या पत्नी पूर्वा […]
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
4kanews कामोठे दि. 18पनवेल (प्रतिनिधी) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा गेल्या ६५ वर्षांपासून अखंड जागर करणाऱ्या पनवेल येथील श्री. मदन कोळी परिवाराच्या गणेशोत्सवाला यंदाही भक्ती आणि कलात्मकतेची अनोखी जोड लाभली आहे. दरवर्षी आपल्या आकर्षक व वैविध्यपूर्ण देखाव्यांमधून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोळी परिवाराने यंदा ‘श्री नरसिंह अवतार’ […]
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
4kNews कामोठे दि. 17 उद्योगांची बँक हमी वाढविण्यासह प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा होणार अभ्यासपनवेल (प्रतिनिधी) : राज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच उद्योगांकडून घेतली जाणारी बँक हमी (डिपॉझिट रक्कम) वाढविण्याबाबत अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय समिती गठित केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून, […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
4kNews कामोठे उरण दि १७(विठ्ठल ममताबादे ) देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण मानव सेवा संघाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी रा. जि. प. शाळा, डाऊरनगर, उरण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत […]
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
4kNews कामोठे “पक्षाने दाखविलेला विश्वास जनसेवा व संघटनबांधणीतून सार्थ ठरवू” — आदित्य घरतउरण, दि. 15(विठ्ठल ममताबादे) : उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व कामगार नेते आदित्य यशवंत घरत यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या […]
