पनवेल दि.०७ (संजय कदम) : विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांत, रायगड विभागातर्फे गीता जयंती निमित्त शौर्य संचलनचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पथ संचलन व त्यांनतर विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख वक्ते यांची मार्गदर्शनपार सभा होणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी नागरिकांना संताचे […]
ब्लू पॅंथर्स पनवेल संघटनेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी अल्पोपहार व चहा पाणी वाटप
पनवेल (6 डिसें ).कामोठे (4kNews)- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण भारतामध्ये अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. बाबासाहेबांवर ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला त्या दादर चैत्यभूमी या येथे संपूर्ण भारतातील अनेक लोक प्रत्यक्षपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते […]
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव
कामोठे (4kNews)जगभरात 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. दिनांक 03 /12 /2024 रोजी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग रायगड अलिबाग व डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक् अक्षम मुलांची विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांगाना प्रोत्साहन मिळावे व […]
तळोजा पोलिसांतर्फे गुन्ह्यातील जप्त 4 मोटार सायकलींचा जाहीर लिलाव,
पनवेल, दि.4 (4kNews) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्ह्यातील जप्त 4 मोटार सायकलींचा जाहीर लिलाव दि.6/12/2024 रोजी तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात येणार आहे. यामध्ये यामहा मोटार सायकल, पल्सर मोटार सायकल अशा 4 वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असून, सदर वाहने घेण्यास कोणी इच्छुक असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्र.022-27412333, 9082125141, 9870301090 वर संपर्क […]
अॅड.मनोज भुजबळ यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजतर्फे आले गौरविण्यात
पनवेल, दि.4 (4kNews) ः वकील दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजतर्फे नामांकित वकील मनोज भुजबळ यांना सर्टीफिकेट देवून गौरविण्यात आले आहे. अॅड.मनोज भुजबळ यांनी आतापर्यंत केलेल्या कामााचे रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे प्रेसिडंट रो.विजय गोरेगावकर, सचिव रो.रुपेश यादव, व्होकेशनल डायरेक्टर रो.काशिराम पाटील, डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रो.शितल शहा, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर रो.मधुमिता बर्वे आदींनी कौतुक […]
पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे गंभीर दुखापत अपघात झाला आहे.
अपघात ता.वेळ व ठिकाण :-आज दि.04/12/2024 रोजी 12:20 वाजताचे सुमारास दृतगती मार्गाचे पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे अपघात झाला आहे. गंभीर दुखापत अपघात अपघातातील वाहन :-1) अल्टो कार क्र-MH03CB48602) अज्ञात वाहन अपघातामधीलगंभीर जखमी( अल्टो कार क्र-MH03CB4860 ) 1) कल्पना वसंत सैद वय 572) कविता लक्ष्मण शिंगोटे वय603) वसंत सदाशिव सैद वय 624)लक्ष्मण […]
राज्यस्तरीय ऊर्जा मेळा
रायगड जिल्ह्यात टाटा पॉवरने महाराष्ट्र स्तरावर आयोजित केलेल्या ऊर्जा मेळ्यामध्ये १० शाळांमधील ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मिळून नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटीज मधून ऊर्जा संवर्धन विषयी माहिती आणि STEM शिक्षण मिळवले. रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी टाटा कंपनी मार्फत उर्जा मेळा २०२४ या महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षणाचे महत्त्व वाढविणे हा आहे. यामध्ये विज्ञान, चित्रकला, प्रश्न मंजुषा स्पर्धा, पोस्टर मेकिंग, विज्ञान कार्य मॉडेल अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
रामकी कंपनी संरक्षण भिंत कोसळली; आमदार प्रशांत ठाकूर यांची घटनास्थळी पाहणी; गावकऱ्यांसोबत समिती नेमण्याची सूचना
पनवेल (प्रतिनिधी) 4kNews रामकी कंपनी भोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत गुरुवारी कोसळली. सुरक्षा भिंतीवर लिचडचा भार येऊ नये, याची काळजी घेणे गरजचे असूनही निष्काळजीमुळे ही भिंत कोसळ्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि या अनुषंगाने योग्य उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता गावकऱ्यांसोबत एक समिती […]
विद्यार्थ्यांनी मिळून नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटीजमधून ऊर्जा संवर्धन विषयी माहिती आणि STEM शिक्षण मिळवले.
रायगड जिल्ह्यात टाटा पॉवरने महाराष्ट्र स्तरावर आयोजित केलेल्या ऊर्जा मेळ्यामध्ये १० शाळांमधील ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मिळून नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटीजमधून ऊर्जा संवर्धन विषयी माहिती आणि STEM शिक्षण मिळवले.
चांगू काना ठाकूरआर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , न्यू पनवेल (स्वायत्त) येथे नॅक पिअर टीमची व्हिजीट
पनवेल (प्रतिनिधी) राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद ही देशभरातील उच्च शिक्षण प्रदान करणाऱ्या शैक्षणिक संस्थानांचे शास्त्रीय पद्धतीने शैक्षणिक परीपेक्ष्य, अध्ययन-अध्यापन प्रणाली, विस्तारकार्य, संशोधन, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आदी निकषांच्या आधारे मुल्यांकन करून त्यांना श्रेणी प्रदान करते. याच धर्तीवर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पिअर टीमची भेट दि. २ आणि ३डिसेंबर २०२४ रोजी यशस्वीपणे संपन्न झाली. या शैक्षणिक मुल्यांकन भेटी दरम्यान नॅक पिअर टीम सदस्यांनी महाविद्यालयातील […]
