4k समाचार दि. 25 एकात्मता, मानवतावाद आणि अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रप्रेमी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. त्यांना जयंतीनिमित्त भाजपचे […]
दिवाळी अंकामुळे दिवाळी सण ज्ञानाचा उत्सव
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष सदानंद मोरे
4k समाचार दि. 25 पनवेल (हरेश साठे) मराठी साहित्यात दिवाळी अंकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवाळी ही केवळ फराळ, फटाके व आनंदसोहळ्यापुरती मर्यादित नसून, दिवाळी अंकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार, साहित्य व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळी सण दिवाळी अंकाच्या अनुषंगाने ज्ञानाची सुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे […]
अभिनव सामाजिक विकास मंडळ आयोजित नवरात्रौत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
4k समाचार दि. 25 गुळसुंदे गावातील अभिनव सामाजिक विकास मंडळ आयोजित शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यंदा उत्सवाचे १६ वे वर्ष असून मंडळाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळ-संध्याकाळ आरती, तसेच सांस्कृतिक उपक्रमांमुळे वातावरणात उत्साहाचे व भक्तिरसाचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळत आहे.उत्सवाच्या काळात गरबा-दांडिया, विविध स्पर्धा, विशेष कार्यक्रम, तसेच […]
अमरधाम स्मशानभूमीच्या दूरवस्थेबाबत शिवसेनेचे आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन
4k समाचार पनवेल दि.२६ (वार्ताहर) : पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीच्या दूरवस्थेबाबत शिवसेनेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिवसेना स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी दिला आहे. शिवसेनेच्या वतीने अमरधाम स्मशानभूमीच्या कंत्राटदाराची सदोष व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत आयुक्त मंगेश […]
सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून केला खुन; पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे एक तासात आरोपीला अटक
4k समाचार पनवेल दि.२६ (संजय कदम) : सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून खुन करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शलने प्रसंगावधान दाखवत पळून जाण्याच्या बेतात असताना त्याला अटक केली. करंजाडे से. ५ पोलीस चौकी समोर जाणाऱ्या रोडला एक ४७ वर्षाच्या पुरुषाचा दगडाने ठेचुन खुन झाल्याची माहिती फोनद्वारे पोलीस हवालदार माधव शेवाळे यांना बातमीदाराने दिली. […]
नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने व्हावे – पत्रकारांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी..
मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले. पत्रकारांनी या वेळी स्पष्ट केले […]
कामोठे, सेक्टर 18 चा पेट्रोल पंप नागरिकांच्या सेवेत दाखल होणार – भाजप पदाधिकाऱ्यांची ग्वाही
कामोठे शहरातील नागरिकांना गेली तीन वर्षे प्रतीक्षा असलेला सेक्टर 18 येथील पेट्रोल पंप आता लवकरच सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कामोठे :25 Sep (4K समाचार)आज कामोठे मंडळ भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या पेट्रोल पंपाची पाहणी करून थेट मालकांशी संपर्क साधला. मंडळ अध्यक्ष विकास घरत व समाजसेवक रवी गोवारी यांनी पंप मालकांशी दूरध्वनीवर संवाद साधत अडचणी […]
इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे शिक्षकांचा सत्कार आणि विद्यार्थीनींना ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन
4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयातील गुणवंत शिक्षकांना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. क्लब सीपीसी सुलभा निंबाळकर यांनी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन केले तसेच या विद्यालयातील चित्रकला विषयाच्या स्पर्धा परीक्षा […]
सीकेटी महाविद्यालयात लोगो डिझाईन आणि अतिथी व्याख्यान संपन्न
4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय(स्वायत्त) येथे विज्ञान संघटना यांच्या मार्फत ‘जीवनशैलीतून तरुणांना आकार देणे’ या विषयावर अतिथी व्याख्यान व तंत्रज्ञानाशी सुरक्षित विज्ञान व हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जा, जीवनासाठी एआय या विषयावर लोगो डिझाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. […]
क्रेड–इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड लाँच : ई-कॉमर्स खर्चावर ५% रिवॉर्ड्स, फ्लाइट्स-हॉटेल्सवर सोपी रिडेंप्शन सुविधा
4k समाचार दि 23 पनवेल (प्रतिनिधी) सर्व प्रकारच्या ई-कॉमर्सवर रिवॉर्ड्स आणि फ्लाइट्स, हॉटेल्स, शेकडो व्यापारी आणि हजारो उत्पादनांवर तत्काळ, लवचिक रिडेम्प्शन यांसह क्रेडने एक नवीन क्रेडिट कार्ड प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्राममधील पहिले सादरीकरण म्हणजे क्रेड इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड आहे. क्रेड सदस्य हे अनेक क्रेडिट कार्ड्स असलेले आणि ज्यांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात […]
