नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

4kNews कामोठे दि. 13

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पनवेल महानगरपालिका कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला एसआयआर अभियानाचे प्रदेश संयोजक माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महापालिका क्षेत्रातील विविध मतदारसंघांमधील मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर रणनीती आखण्यात आली. 

या बैठकीत महापालिका हद्दीत गेल्या काही काळात वितरित करण्यात आलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. या बैठकीला  सभागृहनेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक परेश ठाकूर, रवींद्र भगत, सुमित झुंझारराव, अजय बहिरा, शशिकांत शेळके, प्रीती जॉर्ज, अस्मिता घरत, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटये, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या दोषमुक्त करणे आणि अवैध नोंदी रोखणे यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top