Category: पनवेल

दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष

4k समाचार दि. 17 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका आयोजित व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५. ३० वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. यंदाचे हे ९ वे वर्ष असून  या […]

शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल

4k समाचार पनवेल (प्रतिनिधी) प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल दि. बा. पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्या तसेच नामदेव गायकवाड गुरुजी यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याबद्दल शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अखेर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमनुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.     शेतकरी कामगार पक्षाचे आणि मुंबई कृषी उत्पन्न […]

आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर

4k समाचार पनवेल, दि.17  (वार्ताहर) ः आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवस साजरा करताना पुढे अजून जगण्याची उर्मी मिळते व एक वेगळाच आनंद मिळतो असे प्रतिपादन शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी आपल्या कुटुंबियांसह मित्र परिवाराच्या साथीने व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने वाढदिवस साजरा करताना केले.  शिवसेना सल्लागार व मा.नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण रमेश गुडेकर […]

भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

4k समाचार पनवेल दि. 17 (संजय कदम) : दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे प्रकाशन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी सुमित दसवते, ब्रिजेश बहिरा, यज्ञेश पाटील, समीप मोहोकर, संतोष वर्तले, चेतन म्हस्कर, सचिन भगत, भावेश शिंदे, रोशन जाधव, विजय बहिरा, संकेत दसवते, चिन्मय […]

उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

पनवेल दि.१६(संजय कदम): उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल उरण येथे शालेय परिवहन समितीच्या बैठकीस भेट देण्यात आली. सदर बैठकीस मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, बस चालक व ऑपरेटर प्रतिनिधी, परिवहन प्रभारी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान उरण वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन पो.उप.नि. उद्धव सोळंके यांनी केले. […]


आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा संपन्न

4k सामाचार दि. 16 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल(अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा ८ ऑक्टोबर  ते १६ऑक्टोबर  पर्यंत आयोजित करण्यात आली होती.  मुलांच्या गटातील या आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे […]

रायगड जिल्ह्यात जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा विजय : शेल इंडियाच्या कामगारांना तब्बल १ लाख २० हजार रुपये बोनस 

4k समाचार दि. 16 पनवेल (प्रतिनिधी)  देशातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असलेल्या दिपावलीनिमित्त कामगारांना त्यांच्या आस्थापनांकडून बोनस दिला जातो. यंदा रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बोनस वाटपाच्या चर्चांना वेग आला असताना, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगारनेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेने कामगारांच्या […]

ओरायन मॉलने साकारला भला मोठा सिंधुदुर्ग किल्ला’; मॉल संस्कृतीत आपले सण उत्सव जोपासण्याचा संदेश

4k समाचार पनवेल दि.16 (संजय कदम): शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्यांचे महत्त्व खूप जास्त होते.ते फक्त संरक्षणासाठी नव्हते तर स्वराज्याच्या राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक धोरणांचा आधार होते. किल्ले ही स्वराज्याची प्रबळ सुरक्षा व्यवस्था होती, ज्यातून शत्रूंपासून स्वराज्याचे संरक्षण करणे, लष्करी कारवाया करणे आणि सैन्यासाठी आश्रयस्थान मिळवणे शक्य झाले. राजगड, रायगड यांसारख्या किल्ले राजधानी आणि प्रशासनाचे केंद्र […]

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कामोठेकरांचा पुढाकार — सहा लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचा मदतीचा हात!

4k समाचार दि. 16 कामोठे : सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत कामोठे रहिवाशी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ कामोठे आणि जय हरी महिला मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने बीड व शेवगाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत अभियान राबविण्यात आले.या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष पोपट शेट आवारी यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सहा लाख रुपये […]

चिंद्रनमधील भूसंपादनाविरोधातील आंदोलन तीव्र; महिलांचा पाण्यात उतरून निषेध

4k समाचार दि. 15 नवी मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाने (MIDC) केलेल्या भूसंपादनाला अन्यायकारक ठरवत तळोजा परिसरातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाने आता अधिक तीव्र रूप धारण केले आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी चिंद्रन गावातील महिलांनी पाण्यात उभे राहून आपला तीव्र संताप व्यक्त केला. सहभागी महिलांपैकी काहींची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या […]

Back To Top