भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघाने आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या सदस्य नोंदणी अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर सक्रिय सदस्य झाले आहेत. त्या संदर्भातील सक्रिय सदस्य फॉर्म पनवेल शहर भाजपचे अध्यक्ष अनिल भगत यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश […]
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यतिथी
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यतिथी निमित्त शिरढोण येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी क्रांतीज्योती मित्र मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रांतिज्योतचे नामदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा क्रीडा मेळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा पहिला वार्षिक क्रीडा मेळा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झाला.क्रीडा मेळ्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक अमोघ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावून करण्यात आले. त्यानंतर मशाल प्रज्वलन व शपथविधी सोहळा झाला. या वेळी […]
टीआयपीएल प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट
ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.च्या सौजन्याने टीआयपीएल प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टीआयपीएल कर्मचाऱ्यांकरिता शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानात रंगलेल्या या स्पर्धेत १६ संघांचा सहभाग होता . पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, अभिजित कडू, अरुण घरत, धनंजय करतुरी, […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते न्हावेखाडी मधला पाडा येथे शिव मंदिर जीर्णोद्धार सोहळा
पनवेल (प्रतिनिधी) तालुक्यातील न्हावेखाडी मधला पाडा येथे शिव मंदिर जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कैलासवासी मुक्ताबाई मोकल आणि नागेश मोकल यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या श्री शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनः प्रतिष्ठापना आज (सोमवारी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. सावळाराम मोकल आणि कुसुम मोकल यांनी स्वखर्चातून बांधलेल्या शिव मंदिराचा […]
पनवेल शहर पोलीस ठाणे लवकरच प्रशासकीय भवनात स्थलांतरीत होण्याची चिन्हे
पनवेल दि.१७ (संजय कदम) : गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत असलेले प्रशासकीय भवन आता पूर्णत्वास येत असून आता लवकरच पनवेल शहर पोलीस ठाणे येथे स्थलांतरीत होण्याची चिन्हे आहेत. पनवेल शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या नव्या ‘प्रशासकीय भवन’ या इमारतीचे बांधकाम (न्यायालयीन प्रकरण जागा वगळून) पूर्ण झाले आहे. त्यामुळे इमारतीमधील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयीन जागा तहसिल […]
चिंचवण उड्डाणपुलावर दोन गाड्यांचा अपघात; चालक जखमी
पनवेल दि.१७ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील चिंचवण गावाच्या हद्दीतील उड्डाणपुलावर दोन वाहनांचा अपघात होऊन यामध्ये टेम्पोचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल बाजूकडून पेण बाजूकडे खाद्यपदार्थाने भरलेला टेम्पो जात असताना त्याला औषध पोहोचवणे टेम्पो याने त्याला मागून धडक दिली. यामध्ये खाद्यपदार्थाने भरलेला टेम्पोमधील चालक जखमी झाला आहे. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनीसोबत माधुरी लोखंडे यांनी वाढदिवस केला साजरा
पनवेल दि.१७ (वार्ताहर) : नवी मुंबईतील घणसोली येथील स्थायिक असलेले आणि शासकीय आदीवासी आश्रम शाळा चिंबीपाडा येथे स्त्री अधिक्षिका या पदावर कार्यरत असलेल्या माधुरी लोखंडे शासकीय नोकरी मध्ये रुजू झाल्यापासून आपला वाढदिवस या आदिवासी विद्यार्थी विद्यार्थीनी सोबत साजरा करून आपला वाढदिवसाचा आनंद या विद्यार्थ्यांसोबत सहभागी होऊन साजरा करीत आहे. सामाजिक भान ठेवून आपल्याला आनंद कसा […]
उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांना पनवेल तालुक्यातील एक मोठा धक्का ,
उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांना पनवेल तालुक्यातील एक मोठा धक्का , उपमुखंमंत्री एकनाथ शिदें यांच्या उपस्थितीत उबाठा गटाचे पनवेल तालुका अध्यक्ष रघुनाथशेठ पाटील शिवसेना शिंदे गट जाहीर प्रवेश केला. उबाठा गटाचे पनवेल तालुका अध्यक्ष रघुनाथशेठ पाटील यांनी अनेक पदाधिकार्यांसह काल रात्री उपमुखंमंत्री एकनाथ शिदें यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत […]
*सिद्धांत सामाजिक संस्थेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन*
पनवेल (दि.17)- सिद्धांत सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल मधील स्व.दि.बा.पाटील शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेमध्ये वेगवेगळे गट मिळून एकूण 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पहिली ते सातवी शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच खुला गट अशा प्रकारचे वर्गीकरण करण्यात आले होते. छत्रपती […]
