नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

पाणी परिषदेला माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांचा पाठिंबा

4kNews कामोठे
पनवेल दि.23 (वार्ताहर) : पनवेल शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आयोजितपाणी परिषद घेण्याच्या धोरणाला माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पाठिंबा दिला असून यासंबंधीचे पत्र त्यांनी महापौर नितीन पाटील यांना सुपूर्द केले.  
यानिवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, पनवेल शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आपण उचललेली पावले अभिनंदन आणि स्तुत्य आहेत ज्याद्वारे पनवेल मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मदत व्हावी म्हणून तातडीने पनवेलचे कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकाची न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना (टप्पा क्रमांक ३) चा पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी आढावा बैठक घेतली. त्यानुसार त्यामध्ये असलेला शासकीय त्याचबरोबर जमीन अधिग्रहण किंवा नागरिकांकडून होत असलेल्या 

अडथळ्यांबाबत त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी व सोडवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर +यांच्या सूचनेप्रमाणे आपल्या सहकारी नगरसेवकांवरती जबाबदारी सोपवणे म्हणजे सामान्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करणारी घटना आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर या विषयावरती आपण पाणी परिषद घेणार आहात हे ऐकून मनस्वी आनंद झाला की या आणि परिषदेद्वारे सर्वसामान्य जनतेला सामावुन घेऊन त्याची व्याप्ती वाढवावी व त्याद्वारे पाण्याचे महत्व पाण्याचा गैरवापर पाण्याचा योग्य वापर पाण्याचे पुनर्निर्माण बाबींमध्ये नागरिकांना दक्ष ठेवून आदर्श पनवेलच्या कल्पनेमध्ये अभिप्रेत पाणीपुरवठा निरंतर सुरळीत पनवेलकरांसाठी उपलब्ध होईल असे त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top