नवीन बातम्या
संघर्षातून कर्तृत्व, कर्तृत्वातून नेतृत्व आणि नेतृत्वातून समाजसेवा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मान
राज्याप्रमाणे ३३ जातींना केंद्रातही ओबीसी आरक्षण द्यावे
ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे यांची मागणी
कामोठ्यात ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा उत्साहात
ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी व अपेक्षांवर साधला संवाद
नवरात्र-दिवाळीतही गणेशोत्सवाप्रमाणे वाहतूक नियोजन करा भाजप सरचिटणीस अमित ओझे यांची वाहतूक पोलिसांकडे मागणी
अचानक तीव्र वेदनांनी २१ वर्षीय तरुणाच्या वृषणाला पिळ वेळेत उपचार मिळाल्याने वृषण वाचवण्यात डॉक्टरांना यश
सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉच्या अँटी-रॅगिंग समितीवर संजय कदम
राजेश गायकर यांची भाजपच्या खालापूर पश्चिम मंडळ संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
कामोठे-कळंबोलीतील नागरी समस्यांबाबत लीना गरड यांना निवेदन अपुऱ्या पाणीपुरवठ्यासह रस्ते, वीज व कचऱ्याच्या समस्यांकडे वेधले लक्ष
ओरिएंटल इन्शुरन्सच्या डिजिटल एक्सप्रेस कॉर्नरचे पनवेलमध्ये उद्घाटन

न्यू बॉम्बे कराटे क्लबच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
आशिया चषक व अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेत विविध पदकांची कमाई

4kNews कामोठे

पनवेल, दि. 8  (वार्ताहर) : अमेरिका-जपान कराटे असोसिएशन इंटरनॅशनलशी संलग्न न्यू बॉम्बे कराटे क्लबच्या खेळाडूंनी आशिया चषक २०२६ तसेच अखिल भारतीय खुल्या कराटे अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विविध पदकांची कमाई केली. 



देशभरातील नामांकित खेळाडूंच्या सहभागात झालेल्या या स्पर्धांमध्ये क्लबच्या खेळाडूंनी कुमिते आणि काटा प्रकारांत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. सातत्यपूर्ण प्रशिक्षण, शिस्त, कठोर सराव आणि पालकांचे सहकार्य यामुळे ही कामगिरी साध्य झाल्याचे क्लबच्या वतीने सांगण्यात आले. 



क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष रोहन यादव, अमेरिका-जपान कराटे असोसिएशन इंटरनॅशनल इंडियाचे राष्ट्रीय प्रतिनिधी योगेश कांबळी आणि संचालक बिपिन राय यांनी सर्व विजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना घडविण्यासाठी सातत्याने प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जात असून, आगामी स्पर्धांमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याचा निर्धार खेळाडूंनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top