अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू पराभूत झालेत. पण सर्व कार्यकर्त्याचे मी आभार मानतो त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले.

माझ्या या पराभवाने तुम्ही खचून जाऊ नका. बच्चू कडू पदामुळे नाही तर कार्यामुळे आहे. हे कार्य आपण पुढे करत राहू, तुम्ही स्वतःला एकटे समजू नका.

आज हरलो तरी उद्या आपण जिंकेल. कुठे चुकलो असेल कुठे कमी पडलं असेल त्याचा शोध घेऊ., अशा शब्दात बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं.
