पनवेल दि. १४ ( वार्ताहर ) : आमली पदार्थ विरोधात खांदेश्वर पोलिसांचे जनजागृती अभियान करीत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे . आमली पदार्थ म्हणजे ज्या पदार्थाचे सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना अंमली पदार्थ म्हणतात.त्यामध्ये गांजा, चरस, हेरॉईन, कोकेन, मॅफेड्रॉन, ब्राऊन शुगर अशा पदार्थाचा समावेश होतो.अंमली पदार्थामुळे मानवी शरीरावर होणारे परीनाम म्हणजे स्मरणशक्तीचा -हास होणे, नविन गोष्टी शिकण्याची क्षमता कमी होते, ग्रहणशक्ती कमी होते, विचारशक्ती कमी होते, असंबध्दता निर्माण होते, चिंता व भय, मुत्रपिंड खराब होते,

हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणे, फुफुस निकामी होने, मेंदुत रक्तस्त्राव होणे, आकडी येणे, सभ्रमावस्था होणे, मानसिक आजार, निद्रानाश होणे, अंमली पदार्थ मिळाले नाही तर बेचैन होणे असे प्रकार होतात. जो कोणी आपला मित्र अथवा मैत्रीन अचानक एकांती राहु लागला त्याच्या हाता पायावर इंजेक्शन खुणा दिसल्या, स्वभाव अचानक चिडचिडा झाला,

पैसे उधार मागु लागला, वर्गामध्ये गैरहजर राहु लागला, शुन्यात नजर लावु लागला, उलटया करून आचके देवु लागला असे निदर्शनास आल्यास आपले वर्गशिक्षक अथवा खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कळवा आपले मित्र अथवा मैत्रीन यांना एकटे सोडु नका त्यांच्या पालकांना याबाबत कल्पना दया, तुम्हाला अशाप्रकारे मादक पदार्थाचे सेवन करण्यास आमिष दिल्यास अथवा प्रोत्साहीत केल्यास त्याला बळी पडु नका, आपल्या शाळा, सोसायटी परीसरात अशाप्रकारच्या संशयीत पदार्थाची विक्री करणारी व्यक्ती आढळल्यास तात्काळ आपल्या शिक्षक अथवा पालक व खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कळवा.
