Tag: #Kamothe #पनवेल

दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानातील अतिरिक्त खर्चाची चौकशी करा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम यांची पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी; दोषी ठेकेदारांवर कारवाईचा इशारा

पनवेल, दि. 22 (वार्ताहर) : नवीन पनवेल येथील दिलीप वेंगसरकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या राजीव गांधी मैदानावरील निकृष्ट कामामुळे झालेल्या कथित अतिरिक्त खर्चाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख दीपक रा. निकम यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानावर सुमारे ९ कोटी […]

पनवेल-खारघर आरटीओतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा

4kNews कामोठे आंदोलनास परवानगी नाकारली; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहाबाज पटेल यांचे परिवहन अधिकाऱ्यांना निवेदनपनवेल, दि. 22(वार्ताहर) :   प्रादेशिक परिवहन विभागाच्या पनवेल-खारघर येथील कार्यालयात सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असलेल्या एडीसीसंदर्भातील कथित गैरप्रकार व भ्रष्टाचाराच्या प्रकारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी नियोजित आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. मात्र, आंदोलनकर्त्यांनी माघार न घेता प्रादेशिक […]

*‘आशा की किरण’ – माता व बाल आरोग्य विषयक प्रशिक्षण उपक्रम*

4कनेस्व कामोठे पनवेल, दि. 22ऑगस्ट 2026 रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइटच्या सहकार्याने  *‘आशा की किरण – Samvaad on Maternal & Child Health’l* या विशेष प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. *“Healthier Mothers. Brighter Children. Stronger India.”*  या संदेशावर आधारित या उपक्रमाचा उद्देश आशा सेविकांना माता व बाल आरोग्याबाबत अद्ययावत […]

मेयर मॅरेथॉनच्या आयोजनातील अनियमिततेची चौकशी करा  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेत्या लीना गरड यांची पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी

4kNews कामोठे पनवेल, दि. 22 (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘मेयर मॅरेथॉन’च्या आयोजनात गंभीर अनियमितता, नियमभंग आणि आर्थिक पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेत्या तथा नगरसेविका लीना अर्जुन गरड यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, […]

कामोठे शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी शैलेश पाटणे

4kNews कामोठे पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक नियुक्तीत नवी जबाबदारीपनवेल, दि. 22  (वार्ताहर) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कामोठे शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शैलेश गजानन पाटणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे […]

महेश साळुंखेंच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात जनसंपर्क दौरा; पेण ते महाड बैठकींचे आयोजन

4kNews कामोठे दि. 22 स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी रायगड जिल्ह्याचा जनसंपर्क दौरा आयोजित केलेली आहे. महाड तालुका अध्यक्ष सुजित जाधव यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त हा दौरा आयोजित केलेला आहे . या दौऱ्यामध्ये पेण, माणगाव, श्रीवर्धन, महाड येथे बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत .  बैठकीचा समारोप महाड येथील […]

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचा मुंबईत राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळा संपन्न

4kNews कामोठे दि.22पनवेल – ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  या पुरस्कार सोहळ्याला दैनिक पुढारी मुंबई आवृत्तीचे संपादक राजेश नाईक,केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल,विश्वस्त गणेश कोळी,युयुत्सु आर्ते,प्रदेशाध्यक्ष एड.विठ्ठल मोघे,सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत,सदस्य अनिल कुरघोडे आदी उपस्थित होते.  या पुरस्कारात आचार्य […]

*कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी पनवेल महापालिकेची आढावा बैठक*

4kNews कामोठे पनवेल, दि. 22 : पनवेल महानगरपालिका हद्दीत मलेरिया, डेंग्यू यांसह कीटकजन्य आजारांचा प्रभावी प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाची आढावा बैठक आज दि.19ऑगस्ट रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली.  या बैठकीस उपमहापौर प्रमिला रविनाथ पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती […]

*खारघर हिल महापौर मॅरेथॉनच्या मार्गाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी*

4kNews कामोठे  दि. 22 पनवेल, : येत्या रविवार, २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’च्या पूर्वतयारीला वेग आला असून, आज महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह महापालिका अधिकारी व संबंधित यंत्रणांनी मॅरेथॉन मार्गाची पाहणी केली. देशातील पूर्ण ४२ किलोमीटर अंतराची पहिली हिल महापौर मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. यावेळी […]

सिडको-पनवेलच्या पाणीपुरवठ्याची श्वेतपत्रिका सादर करा शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी; विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन

4kNews कामोठे पनवेल, दि. १९ (वार्ताहर) : सिडको आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येवर शासनाने तातडीने लक्ष घालावे. या समस्येचे मूळ, उपलब्ध जलस्रोत, पाणी वितरण व्यवस्था तसेच वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन याबाबत सिडको आणि पनवेल महानगरपालिकेने सविस्तर श्वेतपत्रिका सादर करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड-पनवेल उपजिल्हाप्रमुख […]

Back To Top