Tag: #Kamothe #Panvel

*खारघर हिल महापौर मॅरेथॉनच्या मार्गाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी*

4kNews कामोठे  दि. 22 पनवेल, : येत्या रविवार, २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’च्या पूर्वतयारीला वेग आला असून, आज महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह महापालिका अधिकारी व संबंधित यंत्रणांनी मॅरेथॉन मार्गाची पाहणी केली. देशातील पूर्ण ४२ किलोमीटर अंतराची पहिली हिल महापौर मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. यावेळी […]

सिडको-पनवेलच्या पाणीपुरवठ्याची श्वेतपत्रिका सादर करा शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी; विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन

4kNews कामोठे पनवेल, दि. १९ (वार्ताहर) : सिडको आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येवर शासनाने तातडीने लक्ष घालावे. या समस्येचे मूळ, उपलब्ध जलस्रोत, पाणी वितरण व्यवस्था तसेच वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन याबाबत सिडको आणि पनवेल महानगरपालिकेने सविस्तर श्वेतपत्रिका सादर करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड-पनवेल उपजिल्हाप्रमुख […]

भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड; मान्यवरांकडून अभिनंदन

4kNews कामोठे दि. 19 पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर तसेच उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पनवेलचे महापौर नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती […]

आरटीओतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी निवेदन; आंदोलनास परवानगी नाकारल्याने अधिकाऱ्यांची भेट

4kNews कामोठे दि. 19पनवेल/खारघर (प्रतिनिधी) : प्रादेशिक परिवहन विभाग, पनवेल-खारघर येथील कार्यालयात सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असलेल्या एडीसी संदर्भातील कथित गैरप्रकार व भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी नियोजित आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली.  मात्र आंदोलनकर्त्यांनी माघार न घेता प्रादेशिक परिवहन विभागाच्या परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर […]

धोधानी ते माथेरान ‘इको-फ्रेंडली ट्रेक’चे आयोजन; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत निसर्गरम्य ट्रेकिंगचा अनुभव घेण्याची संधी

4kNews कामोठे दि 19 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी ‘धोधानी ते माथेरान ‘इको-फ्रेंडली ट्रेक’ या विशेष ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. हा ट्रेक शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत ट्रेकिंगचा अनुभव सहभागी नागरिकांना घेता येणार […]

रेल्वेस्टेशन परिसरात आठ ठिकाणी ‘नो पार्किंग’ बोर्ड

4kNews कामोठे दि. 19पनवेल : सेक्टर १७ व १८ परिसरातील रेल्वे पार्किंगच्या समस्येवर माजी नगरसेवक संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तोडगा निघाला आहे. महानगरपालिकेकडून रेल्वेस्टेशन परिसरात आठ ठिकाणी ‘नो पार्किंग’ बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.  नागरिकांनी वाहने नो-पार्किंग झोनमध्ये न लावता अधिकृत पार्किंगमध्ये उभी करावीत, असे […]

शासकीय विभागांकडील ८६,६६२ कोटींची देयके प्रलंबित; कंत्राटदार फेडरेशनचे १८-१९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलन

4kNews कामोठे 18 मुंबई, दि. 18 ऑगस्ट : महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांकडून कंत्राटदारांना देय असलेली तब्बल ८६ हजार ६६२ कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनने केला आहे. या प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी फेडरेशनच्या वतीने दि. १८ व १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे.  फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, […]

ग्राहक संरक्षण परिषदेच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह; नियमबाह्य निवडीची चौकशी करण्याची मागणी

4kNews कामोठे मुंबई, दि. १८ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या नियुक्त्या सन २०२२ पासून रखडलेल्या असून, नियुक्ती प्रक्रियेत निर्धारित नियम व निकषांचे पालन झाले नसल्याचा गंभीर आरोप लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर मधुकर आमकर यांनी केला. यासंदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्य सरकारकडे नियुक्ती प्रक्रियेची निष्पक्ष […]

१०८ रक्तदात्यांनी केले रक्तदान; पनवेलमध्ये स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिर

4kNews कामोठे 18 पनवेल (प्रतिनिधी) समाजातील प्रत्येक नागरिकामध्ये स्वैच्छिक रक्तदानाची भावना रुजविणे तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने रुधिरसेतू सेवा संस्था आणि इनरव्हील क्लब पनवेल सिटी यांच्या पुढाकाराने श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ(मेवाड) उपसंघ पनवेल, साधना सदन, विश्राळी नाका येथे देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या […]

विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये वैचारिक मंथन; उदय निरगुडकर यांची अभ्यासपूर्ण मांडणी; तरुणांशी संवाद

  4kNews कामोठे दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष उत्तर रायगडच्या वतीने विभाजन विभीषिका दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार तथा माध्यम सल्लागार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी उपस्थितांशी आणि प्रामुख्याने तरुणांशी सखोल संवाद साधला. हा कार्यक्रम शुक्रवारी पनवेल येथील विरूपाक्ष मंगल कार्यालयात पार पडला.‘नेमकं काय घडलं ! – १९४७’ची फाळणी आणि सध्याची […]

Back To Top