4kNews कामोठे दि. 14 व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६ ने गौरव; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थितीपनवेल (प्रतिनिधी) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या वतीने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल नितीन ढमाले, आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी PDG रो. […]
शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष
4kNews कामोठे दि. 14पनवेल (प्रतिनिधी) : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ११ ऑगस्ट रोजी शिक्षक-पालक संघाची स्थापना बैठक उत्साहात पार पडली. यावेळी २०२६ वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मुख्याध्यापिका मानसी कोकीळ व मनीषा पाटील यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी अर्चना कदम, केतकी मुकादम, जयश्री पाटील व सोनम पवार, तर सचिवपदी फ्रेडा […]
पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
4kNews. कामोठे दि. 13 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी वातावरण भारावलेपनवेल (प्रतिनिधी) भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि ‘देश प्रथम’ या भावनेचा जागर करणाऱ्या भव्य ‘तिरंगा पदयात्रे’चे पनवेल शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या […]
संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
4kNews कामोठे पनवेल, दि.१३ (वार्ताहर) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एससी विभागाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांच्या आदेशानुसार संतोष शरद पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (एससी विभाग) जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. श्रुतीताई शाम म्हात्रे […]
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
4kNews कामोठे दि. 13 मुंबई : महाराष्ट्रातील आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान, मंत्रालय परिसरात मुंडन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला शिक्षिका, शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळे अनेक […]
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार
4kNews कामोठे दि. 13 मुंबई प्रतिनिधी अजित मोहिते आज दि. 05 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा भारत सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाच्या कारकीर्दीला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने ना. रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार येत्या दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईत […]
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
4kNews कामोठे पनवेल, दि. 13 (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर व सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या कामकाजाबाबत निवडणूक प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.एसआयआर कार्यक्रमानुसार बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) किमान तीन वेळा मतदारांच्या घरी जाऊन मतदार नोंदणी व आवश्यक माहितीची पडताळणी […]
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
4kNews कामोठे उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा परिषद उलवे, केंद्र वहाळ, तालुका पनवेल येथील शाळेची विद्यार्थिनी कु. समिक्षा महेश मढवी हिने महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. समिक्षाने रायगड जिल्ह्यात चौथा क्रमांक, तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उलवे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.समिक्षाच्या […]
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
4kNews कामोठे दि. 13 कळंबोली : रस्त्यावर सापडलेली सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल व दीड हजार रुपये असलेली बॅग कळंबोली येथील अविनाश सदाशिव घोटणे यांनी प्रामाणिकपणे कळंबोली पोलीस ठाण्यात जमा केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे पोलिसांकडून कौतुक करण्यात आले. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अविनाश घोटणे यांना कळंबोली परिसरातील रस्त्यावर एक बॅग सापडली. बॅगमध्ये दोन […]
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
4kNews कामोठे दि. 13 मुबंई प्रतिनिधी अजित मोहिते छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक मा. अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी ७ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील मागील दोन महिन्यांतील जनजागृती, आंदोलनात्मक तसेच संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी अभिजीत दिपके यांनी मुंबईकर […]
