4k समाचार दि. 2 आवाज महामुंबईचा चॅनेल चे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र चे रायगड जिल्हाध्यक्ष श्री मिलिंद खारपाटील यांची आगरी सेना पत्रकार संघ उरण तालुकाप्रमुख पदी नियुक्ती आगरी सेना रायगड जिल्हा प्रमुख सचिन मते यांनी जाहीर केली.मिलिंद खारपाटील हे गेली ३६ वर्ष अनेक वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेल मध्ये सक्रिय काम करीत आहेत.श्रमजीवी मध्ये […]
इनरव्हील क्लबच्या वतीने रक्तदान शिबीर; ७७ रक्तदात्यांचे रक्तदान
4k समाचार दि. 2 पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब पनवेल डिस्ट्रिक्ट ३१३ च्या वतीने पनवेल रेल्वे स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ७७ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केईएम ब्लड बँक, पनवेल रोटरी क्लब, कळंबोली रोटरी क्लब, गुरुकुल एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट […]
इनरव्हील पनवेल तर्फे तळोजा कारागृहातील वाचनालयाला पुस्तकांची भेट
4k समाचर दि. 2 पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब पनवेलच्या सदस्यांनी तळोजा मध्यवर्ती कारागृहाला तेथील वाचलायनासाठी पुस्तके भेट दिली तसेच पोलीस व कैदी बांधवांना राखी बांधली. बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश देत या उपक्रमातून कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कैद्यांना प्रबोधनात्मक माहिती देण्यात आली व त्यांच्या वाचनालयासाठी पुस्तके दान करण्यात आली. तळोजा कारागृहातील […]
गुळसुंदे येथे गौराई पूजनाचा सोहळा उत्साहात पारंपरिक जल्लोषात
4k समाचर दि. 2 गुळसुंदे : श्रद्धा, सौंदर्य आणि परंपरेचा अनोखा संगम मानला जाणारा गौराई पूजनाचा सोहळा सोमवारी गुळसुंदे गावात मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. चिंतामण कडवे यांच्या निवासस्थानी गेल्या ७० वर्षांपासून अखंड परंपरेने गौरी-गणपतीचे आगमन होत असून, यावर्षीही या परंपरेला उजाळा मिळाला. गौराई पूजन हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्रियांच्या एकत्र येण्याचा, पारंपरिक संस्कृती […]
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी
शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
4k समाचर दि. 1 पनवेल (प्रतिनिधी) नेहमीच दादागिरीची भाषा करून अनेक जणांना धमकी देणाऱ्या शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांनी आज (शनिवारी) पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम पनवेलमध्ये झाला. या कार्यक्रमात राजेंद्र पाटील […]
लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित
4k समाचार दि. 1 पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व्यक्तिमत्व, रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जिल्हा परिषद गट आणि उलवे नोड भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेशोत्सव तसेच गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील हजारो नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित करण्याचा […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’
4k समाचार दि. 1 पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या पुरुष गटात म्हसळ्याच्या श्री. सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळाने तर महिला गटात कर्जतच्या शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत […]
गेली ६४ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणाऱ्या तुकाराम कोळी यांचा गणेशोत्सव
4k समाचार पनवेल दि. ३१ ( वार्ताहर ) : लोकमान्य टिळकांनी अभिप्रेत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वारसा जपणारे पनवेल मधील गणेश उत्सवात सर्वात उच्च स्थानावर असलेले पनवेल मधील गेली ६४ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणारे तुकाराम कोळी परिवार यांनी या वर्षी “रक्तबीज वध” या देखाव्यात रंगत आणलेली आहे. हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले तुकाराम […]
उरणमध्ये ७७१५ घरगुती, तर २९ सार्वजनिक गणपती विराजमान.
4k समाचार उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )उरण परिसरातील उरण, मोरा,न्हावा शेवा या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर ७७१५ खासगी, तर २९ सार्वजनिक गणपतींचे आगमन सर्वत्र झाले आहे. आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणेशोत्सवाला बुधवार दिनांक २७/८/२०२५ रोजी सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने उरणपरिसरातील तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण सार्वजनिक २९, खासगी ७७१५ असे एकूण ७७४४ गणपती […]
उरण तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश.
4k समाचार उरण दि २30 (विठ्ठल ममताबादे )गोरगरिबांच्या कल्याणासाठी शिवसेना पक्ष रात्रं दिवस कार्यरत असून पक्षाने गोरगरिबांना मोठया प्रमाणात आधार दिला आहे. शिवसेनेचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोक कल्याण कारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जन माणसात शिवसेनेची प्रतिमा उंचावली आहे. शिवसेनेप्रती लोकांचा आदर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण शिवसेनेकडे आकर्षित […]
