उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) दिनांक ०२/०६/२०२५ रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती उरण येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत घारापुरी यांचे वतीने विविध समस्या सोडविण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.१) घारापुरी हे बेट असल्याने येथील ग्रामस्थ कटलरी दुकाने लाऊन उपजीविका चालवतात. मात्र महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या कडून वारंवार दुकाने हटवण्यासाठी नोटिसा […]
घारापुरी ग्रामस्थांना कायमस्वरूपी कटलरी दुकाने मिळावीत म्हणून ग्रामपंचायत घारापुरीचे वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना दिले निवेदन.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान सभेची कोकण भवनवर निदर्शने
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )सोमवार दिनांक २ जून २०२५ रोजी अखिल भारतीय किमान सभेच्या वतीने कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या घरे आणि जमिनीच्या प्रश्नावर राज्यभरात ही निदर्शने करण्यात आली. त्याचाच हा एक भाग होता. या संदर्भात किसान सभेच्या वतीने कोंकण भवन येथील सह आयुक्त पुनर्वसन कोकण विभाग […]
वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा – महावितरण संचालक राजेंद्र पवार यांचे आश्वासन
भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘संदेश यात्रा’द्वारे कंत्राटी कामगारांमध्ये जनजागृती.बैठकीत रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश उरण दि १(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक ३१ मे व १ जून २०२५ रोजी पुण्यातील विश्वकर्मा भवन येथे पार पडली. या बैठकीला राज्यभरातील २८ जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीला रायगड जिल्ह्यातील […]
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातुन अपहरण झालेल्या 3 महिन्यांच्या बाळाची पनवेल शहर पोलीस ठाण्याकडुन 24 तासात सुटका व आरोपीता ताब्यात
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरुन दिनांक 30/05/2025 रोजी 15.00 वा. ते 15.30 वा. च्या दरम्यान 3 महिन्यांच्या बाळाचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले म्हणुन पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. न. 292/2025 BNS 137 (2) (IPC 363) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा असल्याने तात्काळ […]
चिरनेरचे बी.सी.ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी – महेंद्र घरत
उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )बी.सी. ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी असेच आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.आजच्या तरुण पिढीला बी.सी. ठाकूर यांचे कार्य मार्गदर्शक तर आहेच. शिवाय तालुक्यासाठी प्रेरणादायकही ठरणारे आहे. असे गौरउद्गार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी चिरनेर येथे काढले. महावितरण कंपनी पनवेल शाखेचे प्रधान यंत्रचालक प्रिन्सिपल ऑपरेटर बी.सी. […]
बैठकीचे आश्वासन दिल्याने संतोष पवार यांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित.
उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )राज्यातील हजारो कामगार , कर्मचारी, संवर्ग कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रदिर्घ काळापासून प्रलंबित होते या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निवेदने , धरणे, मोर्चे , कामबंद आंदोलने अशी विविध आंदोलने झाली परंतू प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे हजारो कामगारांचे न भरून निघणारे नुकसान होत होते या गंभीर परिस्थितीकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य […]
३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन” निमित्त ब्रह्माकुमारीज पनवेल आणि पनवेल महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम
उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )३१ मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No Tobacco Day) निमित्त ब्रह्माकुमारीज पनवेल सेवाकेंद्राच्या वतीने आणि पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने “आंतरराष्ट्रीय तंबाखू जनजागृती अभियान” अंतर्गत एक विशेष व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम ३० मे २०२५ रोजी जेष्ठ नागरिक सभागृह,सीनियर सिटिझन हॉल,ठाणे नाका रोड, ओल्ड पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. या […]
प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
“नुकसानग्रस्त घरांसाठी जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात”
उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता. दोन दिवसांपूर्वी मुसळधार वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण मधील सारडे गावात काही घरांची वाताहात झाली. घर आणि […]
*प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी*
“नुकसानग्रस्त घरांसाठी जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात
गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता. दोन दिवसांपूर्वी मुसळधार वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण मधील सारडे गावात काही घरांची वाताहात झाली. घर आणि शेतामध्ये पाणी घुसले, काही घरांचे कौल आणि पत्रे सुद्धा […]
परिमंडळ 2 आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न
पनवेल, दि.30 (संजय कदम) ः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 पनवेल व आर.झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून जवळपास 110 अधिकारी व कर्मचार्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. पीडीजे […]
