उरण दि २२(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील आवरे गावातील शेतकरी काळुराम पोशीराम गावंड यांच्या शेतात रत्नागिरी ८ या भात वाणाची ४ सूत्री पद्धतीने यशस्वीरित्या लागवड करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी श्रीमती अर्चना सूळ नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रायोगिक उपक्रम राबवण्यात आला. या प्रात्यक्षिकादरम्यान, उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना ४ सूत्री भात लागवड पद्धतीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. […]
कामोठे येथे रयतच्या मुख्याध्यापकांची सुविचार सभा संपन्न.
उरण दि २२(विठ्ठल ममताबादे ) नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी व शाखाप्रमुख भूमिका या विषयावर रायगड विभागीय कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभाग प्राचार्य व मुख्याध्यापक कार्यशाळा सोमवार दिनांक २१/७/२०२५ रोजी रायगड विभागीय चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली. सदर प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी […]
पाककलेच्या मंचावर महिलांचा जलवा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद”
उरण, दि. २२ (विठ्ठल ममताबादे) :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिला व बालविकास मंत्री कु. अदितीताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून, खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी.पी. खारपाटील हायस्कूल व कॉलेजमध्ये आयोजित “पाककला स्पर्धा २०२५” महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्साहात साजरी केली. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमास महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून […]
अनोळखी इसमाचा मृत्यू
पनवेल दि. २२ ( संजय कदम ) : एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . अनोळखी पुरुष ( आझाद ) अदाजे वय 47 वर्षे, उची-5फूट 6 इच, रंग सावळा चेहरा-उभट असे वर्णन असून मयत अनोळखी इसम हा जागृती रिहॅबलिटेशन सेंटर प्लॉट में 6 सेक्टर-11, तळोजा फाटा ता. पनवेल याठिकाणी भोवळ येवून पडले […]
ओम नमःशिवाय टूर्स पनवेलच्या माध्यमातून 40 यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा सफल
पनवेल दि. २२ 4kसामाचार ( वार्ताहर ) : ओम नमःशिवाय टूर्स पनवेल च्या माध्यमातून पंचक्रोशीतील ४० यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा सफल होऊन ते पुन्हा सुखरूप परतले आहेत . भगवान श्री शिवशंकर भोलेनाथ यांनी पार्वती मातेला ज्या गुफे अमरकथा सांगितली. परंतु ती अमर कथा. 2 कबुतरांच्या जोडीने ऐकली. आणि ते दोघे अमर झाले. आज हजारो वर्षा पासून […]
शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांची मागणी – सुका व ओला कचरा वेगवेगळ्या गाड्यांमधून गोळा करा”
पनवेल दि. २२ 4k समाचार ( संजय कदम ) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या गाड्या सुरु कराव्यात अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे शेकाप कामोठे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्यासह नितीन पगारे ,रमेश गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते . […]
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाकाली चरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत छत्री वाटप
पनवेल दि. २१4k समाचार ( वार्ताहर ) : आज महाकाली चरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगर संघटक गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त खारघर येथील विद्यमाने जेष्ठ नागरिकांना शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते शेकडो जणांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, संघटक विलास व्हावळ, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर […]
महामार्गावरील उभ्या ट्रेलर मधून किमती ऐवज चोरणाऱ्या चॊकडीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड
पनवेल दि. २१ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील पनवेल ते शेडुंग जाणाऱ्या ओव्हरब्रीज जवळ लघवी करता थांबलेल्या ट्रेलर चालकाच्या ट्रेलर मधून मोबाईल , रोख रक्कम व इतर कागदपत्रे चोरणाऱ्या चॊकडीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे याबाबतची तक्रार ट्रेलर चालक विनोद बिंद याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करताच वपोनि गजानन घाडगे यांच्या […]
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील १०० विद्यार्थिनींना यष्टी प्रशिक्षण
पनवेल दि. २१ 4k समाचार ( वार्ताहर ) : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील १०० विद्यार्थिनींना सांस्कृतिक प्रकोष्ठ, कोकण विभाग,भाजप व राष्ट्र सेविका समिती, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने यष्टी प्रशिक्षण देण्यात आले. काळाची गरज ओळखून इ. ७ वी व ८ वीत शिकणाऱ्या इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थिनींना यष्टी या प्राचीन […]
विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम बेलपाडा, खारघर येथे संपन्न
पनवेल दि.21 जुलै 4k समाचार महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल महानगर संघटक श्री. गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने बेलपाडा, खारघर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य […]
