पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पत्नीला भेटण्यासाठी ठाण्याला जात आहे असे सांगून घरातून निघून गेलेला 32 वर्षीय तरुण घर न परतल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिली आहे. आदित दिलीप क्षीरसागर (32) असे त्याचे नाव आहे. त्याचा रंग सावळा, उंची पाच फूट दहा इंच, मध्यम बांधा, उभट चेहरा, नाक सरळ असे त्याचे […]
भावभावनांचा कल्लोळ प्रत्येकाच्या मनात असतो पुस्तकाचे प्रकाशन झाले,
पनवेल दि.११(प्रतिनिधी):”भावभावनांचा कल्लोळ प्रत्येकाच्या मनात असतो.त्याला शब्दरूप मिळून त्याचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रत्येकाने लिहिते झाले पाहिजे.” असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ गजल- कार ए.के.शेख यांनी काढले.येथील के. गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद- शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काल,शनिवारी वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,” पनवेलनगरी […]
*करंजाडे शहरात शिवसेनेच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली💐!*
आज दिनांक ११ मे २०२५ रोजी, करंजाडे शहरामध्ये शिवसेना करंजाडे शहर विभागातर्फे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना अत्यंत श्रद्धेने आणि कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना करंजाडेच्या वतीने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर ५, करंजाडे, या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. विनोदजी साबळे साहेब, उरण विधानसभा सचिव श्री. हितेश नाईक, तालुका संपर्क […]
पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे अवैध धंद्यांवर कारवाई
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्यांना चांगलाच दणका दिला आहे. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 प्रशांत मोहिते, सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभागाचे अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे व त्यांच्या पथकाने हद्दीतील कोनगाव, वावंजे, वाकडी, नेरे या […]
जे. एम. म्हात्रे यांचा १० मे रोजी भाजपमध्ये प्रवेश; शेकडो समर्थकही होणार सहभागी
पनवेल – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हे येत्या शनिवारी, १० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतीय जनता पक्षात (भाजप) औपचारिकरित्या प्रवेश करणार आहेत. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदान (प्लॉट नं. ६, सेक्टर १२, खारकोपर रेल्वे स्टेशनसमोर) येथे हा भव्य […]
*रिक्षाची चोरी*
पनवेल दि.०७( संजय कदम): पनवेल शहरातील विनम्र हॉटेल समोरील रस्त्यावर उभी करून ठेवलेली ७० हजार रुपये किमतीची रिक्षा अज्ञात चोरटयांनी चोरून नेण्याची घटना घडली आहे. राम कुमार सरोज (वय ४० रा.शिळफाटा) यांनी त्यांची काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा क्रमांक एम एच ०४ एफसी ६५१२ ही विनम्र हॉटेल समोरील रस्त्यावर उभी करून ठेवलेली असता अज्ञात चोरट्याने ती […]
*ज्वेलर्सच्या दुकानातून बुरखाधारी महिलेनें केली चोरी*
पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल शहरातील विनायक ज्वेलर्स या दुकानात आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात महिलेने हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे. सदर महिला या दुनाकात येऊन तिने सोन्याच्या कडा दाखवण्यास सांगून नंतर हातचलाखीने जवळपास २ लाख रुपये किमतीचा सोन्याचा कडा हा तिच्या कडील बाजूस हाताच्या बोटाने ढकलून तो बुरख्या वरती पडल्यावर तो बुरख्याच्या खिशामध्ये […]
बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : मे महिना म्हणजे चोरट्यांचा सुगीचा काळ. या कालावधीत बहुतेक कुटुंब आपल्या मुळ गावी अथवा बाहेरगावी फिरण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरी हेरून ते पूर्णपणे साफ करतात. या सुट्टीच्या हंगामात चोरट्यांचा सुळसुळाट वाढून चोरी, घरफोडी सारख्या घटना घडत असल्याने नागरिकांनी सुट्टीच्या हंगामात बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन […]
उलवे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत मोठी कारवाई
पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : शहरातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याबरोबरच बेकायदेशीर कृत्य आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विविध भागात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवून बेकायदेशीर कृत्य करणारे, अवैध धंदे करणारे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे […]
*अचानकपणे आलेल्या पावसामुळे पनवेलकर सुखावले*
पनवेल दि.०७(वार्ताहर): गेल्या काही दिवसांपासून तापमानाने अक्षरशः कहर केला होता. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा आणि दमट हवामान यामुळे नागरिक हैराण झाले होते. पण आज दुपारी सुमारे बारा वाजता आकाश अचानक गडगडू लागलं, विजा कडाडू लागल्या आणि काही क्षणांतच जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त झालेल्या पनवेलकरांसाठी हा पाऊस एक सुखद गारवा घेऊन आला. गेल्या […]
