पनवेल (प्रतिनिधी) महावाचन उत्सव उपक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकुर पब्लिक स्कूलमधील इयत्ता चौथीतील गार्गी महाडीक हिने उत्कृष्ट वाचन कौशल्याचे प्रदर्शन करत प्राथमिक गटातून रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव २०२४’ हा उपक्रम राबवण्यात आला. हा […]
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात; १५८९६ विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग
पनवेल (हरेश साठे) कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ आंतरशालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वक्तृत्व स्पर्धेत १६ विद्यालयातील १५८९६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील बक्षिसपात्र विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकनेते […]
शिवजयंती निमित्त ‘स्पर्धा गोष्टींची’
पनवेल (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल पनवेलतर्फे ‘स्पर्धा गोष्टींची’ या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गटात वय २५ ते ४५ वर्षे आणि ४५ वर्षेपुढील अशा गटात हि स्पर्धा होणार आहे. छत्रपती शिवाजी […]
शिवजयंती निमित्त भाजपच्यावतीने मराठा वेशभूषा स्पर्धा
पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १९ च्या वतीने बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रा निमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा १५ वर्षांखालील मुलामुलींसाठी असून स्पर्धेला शहरातील गावदेवी मंदिरापासून सकाळी ७. ३० वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १७ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करता येणार असून […]
पनवेल शहरासह कळंबोलीतून रिक्षाची चोरी
पनवेल दि.१६(संजय कदम ): पनवेल शहरासह कळंबोली वसाहती मधून रिक्षाची चोरी झाल्याची घटना घडल्याने रिक्षा चालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे. पनवेल शहरातील जुने पोस्ट ऑफिस परिसरात संतोष दाबके यांनी त्यांची रिक्षा उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर रिक्षा चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत केशव टाकरस यांनी […]
पनवेल परिसरात आढळला मृतदेह
पनवेल दि.१६(वार्ताहर): पनवेल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह नव्याने होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असलेल्या खाडीमध्ये आढळला असून त्याच्या नातेवाईकाचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहे. सदर अनोळखी बेवारस पुरुष इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, डोकयाचे केस काळे, डोळे उघडे व फुगलेले, तोंड उघडे असुन जीभ फुगीर बाहेर आलेली आहे. तर मिशी व […]
शनिवारी ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ; पहिल्या एआय ‘आज्जीबाई जोरात’ महाबालनाट्याची विद्यार्थ्यांना पर्वणी
पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या शनिवारी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेले ’आज्जीबाई जोरात’ हे पहिले एआय महाबालनाट्य […]
माळरान ते हिरवाई; निर्जीव वन जमिनीला केले हरित समृद्ध
पनवेल (प्रतिनिधी) पडीक असलेल्या निर्जीव वनजमिनीला दीपक फर्टिलायझर्सने हरित करत समृद्ध केल्याने म्हाळुंगी येथील वनजमीन माळरान ते हिरवाई अशा प्रवासाने पुनर्जीवित झाली. तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्सच्या प्रकल्पापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेली ही जमीन निर्जीव अवस्थेत होती. आणि त्यामुळे निसर्गाची कुजबुज ओसरल्यासारखी वाटत होती, एक उजाड माळरान मागे सोडले होते, पण आशा हरपली नव्हती. महाराष्ट्र […]
उधाणाच्या पाण्याने घरांना तडे; नुकसान भरपाई अद्यापही प्रतीक्षेत
पनवेल (प्रतिनिधी) खाडी पाण्याच्या उधाणाने बांध तुटून नुकसान झालेल्या धेरंड येथील घरांचे सर्वेक्षण होऊन अद्यापही भरपाई न मिळाल्याने सदरचे घरमालक भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. अलिबाग तालुक्यातील शहापूर विभागातील धेरंड गावात १४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री उधाणाच्या पाण्याने खाडीचे बांध तुटले आणि या पाण्याचा प्रवाह गोविंद कृष्णा पाटील तसेच मारुती कृष्णा पाटील, जनार्दन दया पाटील, मच्छिद्र नारायण […]
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पुढाकार
पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून त्या संदर्भात पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी […]
