नवीन बातम्या
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाजवळ स्लॅब कोसळला; वाहतुकीवर परिणाम, प्रशासनाचे प्रवास टाळण्याचे आवाहन
Matt: USA 250
सलूनमधील टीव्ही ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत का?; मार्गदर्शक सूचनांची गरज असल्याची नागरिकांकडून मागणी
पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*
आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नितीन ठाकरे यांची पदोन्नती; बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून सत्कार
आंतरराष्ट्रीयअंमली पदार्थ नशा-मुक्ती दिनानिमित्त पनवेलमध्ये जनजागृती कार्यक्रमपनवेल,
फक्त रोख रक्कम चोरणारा सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाजवळ स्लॅब कोसळला; वाहतुकीवर परिणाम, प्रशासनाचे प्रवास टाळण्याचे आवाहन



4की News

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात मुसळधार पावसामुळे टनेल क्रमांक २ च्या बाहेरील भागात काँक्रीटचा स्लॅब कोसळल्याची घटना रविवारी घडली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित परिसरातील वाहतुकीवर तात्काळ निर्बंध घालण्यात आले असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुणेहून मुंबईकडे जाणाऱ्या (Pune–Mumbai) मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या टनेल क्रमांक २ च्या बाहेर हा स्लॅब कोसळला. सुदैवाने, घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही वाहन नसल्याने जीवितहानी टळली.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे घाट परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गासह जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक काही काळ थांबविण्यात आली असून, परिस्थितीनुसार पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



घटनास्थळी महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी दाखल झाले असून मलबा हटविण्याचे व मार्ग सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

मुंबई–पुणे किंवा पुणे–मुंबई प्रवासाला निघण्यापूर्वी मार्गाची सद्यस्थिती तपासा.

अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावरील प्रवास टाळावा.

वाहतूक पोलीस व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घाट परिसरात विशेष खबरदारी घ्यावी.


– 4K समाचार
www.4ksamachar.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top