4kNews कामोठे 26 पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची भाजपच्या अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आल्याने पनवेलसह रायगड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या […]
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
4kNews कामोठे 26 पनवेल (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या हस्ते कदम यांचा गौरव करण्यात आला. ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने मुंबई […]
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे )नवीन शेवा व शेवा कोळीवाडा या दोन्ही विस्थापित गावांच्या प्रलंबित प्रश्नाला आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्रालय, मुंबई येथे रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट घेऊन ग्रामसुधारणा मंडळाच्या वतीने दोन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. माजी आमदार मनोहरशेठ भोईर व चंद्रकांत घरत […]
रेट्रोफिटिंग कामांचा थकीत निधी द्या; पाणीपुरवठा कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे
4kNews कामोठे मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी) : अजित मोहिते जल जीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांची थकीत देयके तातडीने अदा करावीत, रेट्रोफिटिंग योजनांसाठी निधी मंजूर करून वितरित करावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेने आझाद मैदान, मुंबई येथे २४ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.संघटनेच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अनेक कंत्राटदारांची […]
४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात
4kNews कामोठे पनवेल, दि. 25(प्रतिनिधी) : सोन्याच्या सहा लगडींचा अपहार करून फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. आरोपीकडून ६६६.२३ ग्रॅम वजनाचे, सुमारे ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले. पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समधील कामगार शुभम मनाजी खिलारे याच्याकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सहा सोन्याच्या […]
कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
4kNews कामोठे पनवेल, दि. 25 (प्रतिनिधी) : कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. करंजाडे परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कथित कॉल सेंटरवर छापा टाकून चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या […]
जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा
4kNews कामोठे पनवेल, दि. २५ (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील कथित विलंब आणि कागदपत्रांच्या मागणीवरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका दप्तरी जन्म-मृत्यूची नोंद असतानाही दुय्यम प्रमाणित प्रत मिळविण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही काही अर्जदारांना अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. […]
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार
4kNews कामोठे दि. 25पनवेल : संस्कार प्रतिष्ठान अंतर्गत अॅड. सौ. सुरेखा प्रशांत भुजबळ (संगीत विशारद) संचालित स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात पार पडला. रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी ठाणा नाका रोड येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला गुरुवर्या सौ. देवताताई प्रसाद सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेविका डॉ. […]
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली
4kNews कामोठे नवी मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : नवी मुंबई गुन्हे शाखा (कक्ष-१, वाशी) पथकाने सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करून ७ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून सहा सोन्याच्या चेन आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. खारघर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज […]
चंदेरी किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या तीन तरुणांची सुखरूप सुटका
4kNews कामोठे दि. 25 पनवेल : चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तीन तरुणांचा डोंगरात रस्ता चुकल्याने ते भरकटले. मदतीसाठी त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून तिघांनाही सुखरूप गडाच्या पायथ्याशी आणले. वावंजे बिट निर्भया एमडीटीवर सकाळी ११.०८ वाजता चंदेरी किल्ल्यावर काही जण अडकल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) […]
