4kNews कामोठे दि. 19 पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर तसेच उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पनवेलचे महापौर नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती […]
आरटीओतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी निवेदन; आंदोलनास परवानगी नाकारल्याने अधिकाऱ्यांची भेट
4kNews कामोठे दि. 19पनवेल/खारघर (प्रतिनिधी) : प्रादेशिक परिवहन विभाग, पनवेल-खारघर येथील कार्यालयात सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असलेल्या एडीसी संदर्भातील कथित गैरप्रकार व भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी नियोजित आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. मात्र आंदोलनकर्त्यांनी माघार न घेता प्रादेशिक परिवहन विभागाच्या परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर […]
धोधानी ते माथेरान ‘इको-फ्रेंडली ट्रेक’चे आयोजन; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत निसर्गरम्य ट्रेकिंगचा अनुभव घेण्याची संधी
4kNews कामोठे दि 19 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी ‘धोधानी ते माथेरान ‘इको-फ्रेंडली ट्रेक’ या विशेष ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. हा ट्रेक शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत ट्रेकिंगचा अनुभव सहभागी नागरिकांना घेता येणार […]
रेल्वेस्टेशन परिसरात आठ ठिकाणी ‘नो पार्किंग’ बोर्ड
4kNews कामोठे दि. 19पनवेल : सेक्टर १७ व १८ परिसरातील रेल्वे पार्किंगच्या समस्येवर माजी नगरसेवक संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तोडगा निघाला आहे. महानगरपालिकेकडून रेल्वेस्टेशन परिसरात आठ ठिकाणी ‘नो पार्किंग’ बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. नागरिकांनी वाहने नो-पार्किंग झोनमध्ये न लावता अधिकृत पार्किंगमध्ये उभी करावीत, असे […]
शासकीय विभागांकडील ८६,६६२ कोटींची देयके प्रलंबित; कंत्राटदार फेडरेशनचे १८-१९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलन
4kNews कामोठे 18 मुंबई, दि. 18 ऑगस्ट : महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांकडून कंत्राटदारांना देय असलेली तब्बल ८६ हजार ६६२ कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनने केला आहे. या प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी फेडरेशनच्या वतीने दि. १८ व १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, […]
ग्राहक संरक्षण परिषदेच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह; नियमबाह्य निवडीची चौकशी करण्याची मागणी
4kNews कामोठे मुंबई, दि. १८ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या नियुक्त्या सन २०२२ पासून रखडलेल्या असून, नियुक्ती प्रक्रियेत निर्धारित नियम व निकषांचे पालन झाले नसल्याचा गंभीर आरोप लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर मधुकर आमकर यांनी केला. यासंदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्य सरकारकडे नियुक्ती प्रक्रियेची निष्पक्ष […]
१०८ रक्तदात्यांनी केले रक्तदान; पनवेलमध्ये स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिर
4kNews कामोठे 18 पनवेल (प्रतिनिधी) समाजातील प्रत्येक नागरिकामध्ये स्वैच्छिक रक्तदानाची भावना रुजविणे तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने रुधिरसेतू सेवा संस्था आणि इनरव्हील क्लब पनवेल सिटी यांच्या पुढाकाराने श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ(मेवाड) उपसंघ पनवेल, साधना सदन, विश्राळी नाका येथे देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या […]
स्वातंत्र्य दिन आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
4kNews कामोठे दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन आणि पनवेल नगरीचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे अंतर्गत चिंचवली, रिटघर, दूंदरेपाडा, दूंदरे आणि शिवणसई येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम माजी सरसपणच रमेश पाटील आणि गुरुनाथ उसाटकर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी […]
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये वैचारिक मंथन; उदय निरगुडकर यांची अभ्यासपूर्ण मांडणी; तरुणांशी संवाद
4kNews कामोठे दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष उत्तर रायगडच्या वतीने विभाजन विभीषिका दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार तथा माध्यम सल्लागार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी उपस्थितांशी आणि प्रामुख्याने तरुणांशी सखोल संवाद साधला. हा कार्यक्रम शुक्रवारी पनवेल येथील विरूपाक्ष मंगल कार्यालयात पार पडला.‘नेमकं काय घडलं ! – १९४७’ची फाळणी आणि सध्याची […]
नागपंचमीनिमित्त ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ जनजागृती
4kNews कामोठे उरण दि. 18 (विठ्ठल ममताबादे) : नागपंचमीनिमित्त सर्पांविषयीचे समज-गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती करण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर-उरण यांच्या वतीने ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ या विषयावर तीन ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल, वाशी येथे तुषार म्हात्रे, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक […]
