पनवेल : 4k समाचार दि. 25 गणेशोत्सवाची पर्वणी म्हणजे भक्ती, उत्साह, एकोपा आणि आनंदाचा महापर्व. त्याचाच भाग म्हणून ओंकार मित्र मंडळ, प्रभू आळी, पनवेल आयोजित ३५ वा गणेश आगमन सोहळा शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता दिमाखदार व भक्तिरसात संपन्न झाला. यंदा मंडळाने बाप्पाचे श्रीकृष्णस्वरूपातील आगमन करून पनवेलकरांसाठी खास आकर्षण निर्माण केले. […]
महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार समितीवर बाळासाहेब तुकाराम भुजबळ यांची शासनाकडून नियुक्ती
4k समाचार उरण दि २3 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र शासनाच्या वतीने किमान वेतन सल्लागार समिती घोषित केली असून सदर समितीवर कामगार प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब तुकाराम भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ माध्यमातून शिरवळ, शिरूर, मावळ, रायगड जिल्ह्यातील संघटित,असंघटित क्षेत्रात बाळासाहेब तुकाराम भुजबळ हे गेली २७ वर्षापासून संघाच्या वतीने काम करीत आहेत. […]
श्री भक्ती विजय ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न.
4k समाचार उरण दि २3 (विठ्ठल ममताबादे ) श्रावण महिना सुरू झाला की उरण मध्ये भाविक भक्तांना ओढ लागते ती ग्रंथ पारायण सोहळ्याची.उरण मध्ये वारकरी संप्रदायातील कीर्तनकार सखाराम गायकवाड यांनी ७५ वर्षापूर्वी ग्रंथ पोथी वाचन पारायणाची सुरुवात केली होती. ती परंपरा आजही ७५ वर्षे अखंडीतपणे सुरू आहे.भाविक भक्तांना अध्यात्म्याची गोडी लागावी नामस्मरणाची गोडी लागावी, नामस्मरण […]
महावितरणच्या स्मार्ट मीटर बसवणीला विरोध शिरवणेकरांचा आंदोलनात्मक मोर्चा
4k सामाचार दि. 22 नवी मुंबई | शिरवणे गाव आणि परिसरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मोठा मोर्चा काढला. डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरवणे गावातील नागरिक व विविध संघटना मिळून नेरुळ येथील एमएसईबी कार्यालयावर धडकले. या वेळी “स्मार्ट मीटर हटवा, जनतेला वाचवा” अशा घोषणांनी परिसर […]
कोपरखैरणेतील घरातून २६ लाखांचे दागिने चोरी
4k समाचार दि. 22 नवी मुंबई | कोपरखैरणे परिसरात तब्बल २६ लाखांचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी घरातील महिलेच्या भावाच्या दोन मित्रांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शिवानी कारकुर व तिचा भाऊ अभिषेक घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. मात्र परत आल्यानंतर त्यांनी कपाट उघडून पाहिले असता सोन्याचे दागिने आणि […]
पनवेलमध्ये सकल मराठा समाज व पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक
4k समाचार पनवेल (वार्ताहर):आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पनवेल डीसीपी कार्यालयात सकल मराठा समाज पनवेल यांच्या प्रतिनिधींची व पनवेल शहर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसणार असल्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.बैठकीला पनवेल शहराचे असिस्टंट […]
उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा लवकरच फेऱ्या वाढणार…
4k समाचार उरण दि २22 (विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे नेते महेश बालदी यांनी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या ४० फेऱ्यांऐवजी ५० […]
मोरा बंदरातील गुजराती मच्छीमार बोटीतील एक खलाशी बेपत्ता
4k समाचार उरण दि २१(विठ्ठल ममताबादे)गेली ५ ते ६ दिवस रायगड जिल्यातील उरण तालुक्यात व परिसरात जोरदार वादळ वारा व पाऊस सुरु आहे.वादळी वाऱ्यामुळे उरण तालुक्यात असलेल्या मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार बोटीतून एक खलाशी बेपत्ता झाला आहे.भरतभाई डालकी (४४) असे या बेपत्ता खलाशाचे नाव आहे.गुजरात राज्यातील वेरावल येथील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची […]
रूमच्या आमिषाने साडेअठरा लाखांची फसवणूक
4k समाचार दि. 21 पनवेल | करंजाडे परिसरात रूम देतो असे सांगून तब्बल १८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कैलासचंद्र प्रजापती यांच्याकडून आरोपी केतन भानुशाली व एजंट मुकेशसिंग यांनी संगनमत करून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेलमध्ये १६ वर्षीय मुलगी फूस लावून पळवली
4k समाचार दि. 21 पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आरना पारधी (वय १६ वर्षे ८ महिने) असे या मुलीचे नाव असून तिचे शारीरिक वर्णन पुढीलप्रमाणे आहे – उंची सुमारे ५ फूट, गोरा रंग, गोल चेहरा, मजबूत बांधा. घटना घडली त्यावेळी तिने […]
