4k समाचार दि. 20 नवी मुंबई | शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरण ९६ टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने येत्या काही तासांत पाणीपातळी ८७.८५ मीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. परिस्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे उघडून धावरी नदीकाठावर […]
मोरबे धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर; दरवाजे उघडण्याची शक्यता
पनवेलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; १३५ जणांचे सुरक्षित स्थलांतर
4k समाचारपनवेल | शहरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. नवीन पनवेलमधील बांठिया विद्यालयासमोरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, करंजाडे वसाहतीतील पुनर्वसित १३५ जणांना तातडीने पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला नागरिकांच्या निवाऱ्याची तसेच खाद्यपदार्थांची सोय करण्याचे आदेश […]
नेरुळमध्ये सिडको घराचे छत कोसळले; महिला जखमी
4k समाचारनवी मुंबई नेरुळ सेक्टर-१ मधील विघ्नहर्ता सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेवर मोठे संकट कोसळले. घरात झोपलेल्या अवस्थेत अचानक छताचे प्लॅस्टर कोसळून त्या महिला जखमी झाल्या. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.. या घटनेमुळे पुन्हा एकदा सिडकोच्या धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक घरे जुनी व जीर्ण झाल्याने […]
नवी मुंबईत दोन दिवसांत आठ सापांना जीवदान; विषारी पिलांचाही समावेश
4k समाचार दि. 20 पनवेल शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा परिणाम वन्यजीवांवरही झाला असून, बिळांमध्ये पाणी शिरल्याने सापांचे दर्शन वाढले आहे. विशेषतः सीबीडी बेलापूर परिसरात दोन दिवसांत तब्बल आठ सापांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये विषारी सापांच्या पिलांचाही समावेश आहे. पुनर्वसु […]
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शिवसैनिक गेले अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून
4k समाचार पनवेल दि. २० ( वार्ताहर ) : पनवेल जवळील कळंबोली सर्कल ते टी पॉईंट येथे रस्त्यात मोठा खड्डा पडला होता त्यामुळे कमीत कमी 1 तास मध्ये 7 ते 8 बाईक वाले आपल्या कुटूंब सहीत पडले होते अशी माहिती मिळताच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शिवसैनिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले . यावेळी […]
महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान संपन्न
पनवेल दि.२०(वार्ताहर): महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान राबवले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर विचुंबे रोडवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून त्यांनी यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने निसर्ग समृद्ध करणारे अभियान राबवल जात असल्याबद्दल त्यांचे आभार मानून पर्यावरण संवर्धनाचा […]
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पनवेल मधील रुद्राणी पाटीलला तीन सुवर्णपदक
पनवेल:पनवेल येथील रुद्राणी परेश पाटील या आठ वर्षाच्या चिमुकलीने दि.15 रोजी उरण येथे आयोजित जिल्हा स्तरित जलतरण आमदार चषकात तब्बल 3 सुवर्ण पदक पटकावले आहेत. रुद्राणीने 50 मीटर फ्रीस्टाइल, बॅक स्ट्रोक, व बटरफ्लाय या तीन प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक व ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारामध्ये तृतीय क्रमांक मिळवून सर्व स्पर्धकांवर आपले वर्चस्व सिद्ध केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य […]
पनवेलजवळ महामार्गावर चार फूट लांबीचा मगर जखमी अवस्थेत आढळला
4k समाचार पनवेल दि. 20 मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलजवळ राऊत सर्जिकल रुग्णालयासमोर चार फूट लांबीचा मगर जखमी अवस्थेत सापडला. हा मगर पाहिल्यानंतर एका नागरिकाने वन्यजीव संरक्षण कार्यकर शतुनू कुवेसकर यांना याबाबत माहिती दिली. कुबेरकर यांनी तातडीने वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क साधला. वन्यजीव रक्षकांनी घटनास्थळी दाखल होत मगरीला सुरक्षितपणे पकडले. मगरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली […]
विमानतळ उड्डाणापूर्वी प्रकल्पग्रस्तांचे अनोखे आंदोलन
4k समाचार दि. 20नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबरपर्यंत सुरु करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र, विमानतळासाठी जमीन संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा एक गट आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यांनी रविवारी पळस्पे ‘ते येथील जेएनपीटी मार्गा वर नांदगाव डोंगरावर चढाई करून सरकारला हाक मारण्याचे अनोखे आंदोलन केले.या आंदोलनाला ठाकरे पक्षाचे उपनेते बाबनदादा पाटील यांनी […]
अवकाळी पावसामुळे ४०० नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलवले
4k समाचार दि. 20 पनवेल पालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुमारे ४०० नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, पालिका प्रशासनाने शाळा व इतर सार्वजनिक ठिकाणी निवारा केंद्रे उभारली आहेत. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या […]
