पनवेल दि.२७(वार्ताहर): राहत्या घरातून कामानिमित्त बाहेर पडलेली महिला अद्याप घरी न परतल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर महिलेचे नाव मुस्कान इक्बाल शेख (वय १९ वर्षे रा चिंध्रण) असून तिचा रंग गोरा, उंची ५ फुट, बांधा मध्यम, अंगात नेसून गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल घातलेली. सोबत काळया रंगाची बॅग, […]
*तळोजा मधील बी जी शिर्के कामगार वासहितमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट*
पनवेल दि.२७(वार्ताहर): तळोजा येथील बी. जी. शिर्के कामगार वसाहती मध्ये महाशिवरात्री दिनी सकाळी सिलेंडर मधून झालेल्या गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत कामगारांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच कळंबोली येथील अग्निशमन दल जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. तळोजा फेज-२ मध्ये सिडको गृहनिर्माण प्रकल्पाचे काम […]
*लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*
पनवेल दि.२७(वार्ताहर) रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लब च्या वतीने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी येत्या शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या धावपळीच्या युगात.. वाढणारी वाहनांची वर्दळ… होणारी ट्रॅफिक.. […]
*समाजसेवक आयु कुणाल लोंढे यांच्या प्रयत्नाने करंजाडे वसाहतीमध्ये गतिरोधक बांधणे व झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्याचे काम सुरु*
पनवेल दि.२७(वार्ताहर): करंजाडे वसाहतीमध्ये समाजसेवक आयु कुणाल लोंढे यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्याने करंजाडे वसाहतीमध्ये गतिरोधक बंधने व झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्याचे काम सुरु झाले आहे. करंजाडे वसाहतीमधील सेक्टर १ ते ६ या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी सदर ठिकाणी गतिरोधक उभारणे , झेब्रा क्रॉसिंग आणि फलक लावणे आदी कामे महत्वाची होती. या बाबत समाजसेवकी आयु कुणाल […]
शिवशक्ती मित्र मंडळातर्फे होळी, शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल, दि.28 (संजय कदम) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या लाईन आळी येथील शिवशक्ती मित्र मंडळातर्फे होळी तसेच शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि.13/03/2025 रोजी होम (होळी पूजन), तसेच महिलांसाठी विविध क्रिडा स्पर्धा व पाचवी ते 10 वी च्या मुलांचे क्रिकेट सामने, शनिवार दि.15/03/2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, सिंगल डान्स, […]
बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी नामदेव गोंधळी घेणार 13 वी भांडाफोड पत्रकार परिषद
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी फसवणूक झालेले गरीब शेतकरी नामदेव गोंधळी यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा त्यांना न्याय मिळत नसल्याने ते येत्या 6 मार्च 2025 रोजी 13 वी भांडाफोड पत्रकार परिषद घेवून शासनाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत वाचा फोडणार आहेत. तालुक्यातील वावंजे येथे राहणारे फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी यांनी घेतलेल्या 12 […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले अभिवादन
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आज सकाळी उपस्थित राहून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी, केशवस्मृती पतपेढीचे अध्यक्ष अमित ओझे, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी, मा.नगरसेवक संजय गुरुजी, संजय कदम, भाजप युवा मोर्चाचे अभिषेक पटवर्धन, […]
भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान
भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघाने आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या सदस्य नोंदणी अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर सक्रिय सदस्य झाले आहेत. त्या संदर्भातील सक्रिय सदस्य फॉर्म पनवेल शहर भाजपचे अध्यक्ष अनिल भगत यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश […]
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यतिथी
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यतिथी निमित्त शिरढोण येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी क्रांतीज्योती मित्र मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रांतिज्योतचे नामदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा क्रीडा मेळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा पहिला वार्षिक क्रीडा मेळा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झाला.क्रीडा मेळ्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक अमोघ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावून करण्यात आले. त्यानंतर मशाल प्रज्वलन व शपथविधी सोहळा झाला. या वेळी […]
