पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा कलाविष्कार असलेला “महाराष्ट्राची महासंस्कृती” या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर १२ मधील प्लॉट क्रमांक ६ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल […]
अखेर कु. सृष्टीच्या कुटुंबाना मिळाला न्याय..
उरण /प्रतिनिधी :पनवेल तालुक्यातील तामसई येथील कु. सृष्टी राजू शिद ही उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रमाशाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होती. अचानक तिच्या पोटात दुखायला लागले. कु. सृष्टी आणि तिच्या मैत्रिणींनी आश्रमशाळेतील असणाऱ्या शिक्षकांना सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर काही तासाने कु. सृष्टीला उपचारासाठी पनवेल येथे नेण्यात आले. उपचार चालू असताना मृत्यूची झुंज देत […]
कोकणचो रुबाब भारी या मालवणी नाटकाने जिंकली रसिकांची मने
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ , पनवेल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात संपन्न झाले. डॉ. भगवान बिरमोळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून […]
पनवेल शहर पोलिसांतर्फे इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी व कर्मचार्यांना नवीन कायदा सायबर फ्रॉड व नवी मुंबई व्हॉटसअप चॅनेल बाबत करण्यात आले मार्गदर्शन
पनवेल, दि.13 (संजय कदम) ः नवीन कायदा व सायबर जनजागृती कार्यक्रमांतर्गत पनवेल शहर पोलिसांतर्फे इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी व कर्मचार्यांना नवीन कायदा सायबर फ्रॉड व नवी मुंबई व्हॉटसअप चॅनेल बाबत मार्गदर्शन करण्यात आले. वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड.सचिन पटेल यांनी उपस्थितांना नवीन कायद्याविषयक मार्गदर्शन केले. तर पो.नि.शाकीर पटेल यांनी पोलीस जनता समन्वयक मार्गदर्शन केले. […]
परदेशी तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करुन राहत असल्याचे निदर्शनास आल्यास सुजाण नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा वपोनि गजानन घाडगे
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत परदेशी तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करुन राहत असल्याचे निदर्शनास आल्यास सुजाण नागरिकांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे मध्ये तात्काळ समक्ष येऊन अथवा फोन द्वारे माहिती द्यावी, असे आवाहन ‘पनवेल तालुका पोलीस ठाणे’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे केले आहे. पनवेल महापालिका हद्दीत विना परवानगी भरवल्या जाणार्या […]
सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी तर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व डॉ.नैना पटेल यांचे महिला आरोग्य मार्गदर्शन, सायं.4 ते 8 या दरम्यान. रविवार दि.16 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजक कच्छ युवक संघ पनवेल सकाळी 10 […]
शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक थंब पध्दत कर्मचार्यांना अनिवार्य असताना पनवेल तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना या पध्दती मधून वगळण्यात आले आहे का?
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक थंब पध्दत कर्मचार्यांना अनिवार्य असताना पनवेल तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना या पध्दती मधून वगळण्यात आले आहे का? याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची खुलासा करण्याची शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात उपजिल्हाप्रमुख भरत पाटील […]
विविध गुन्ह्यातील 25 जप्त वाहनांचा पनवेल शहर पोलीस करणार जाहीर लिलाव
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाणे येथे विविध गुन्हयांमध्ये एकूण 25 वाहने जप्त करण्यात आलेली असून सदर वाहनांचे मुळ मालकांचा शोध घेतला परंतु ते मिळून येत नाहीत. सदरच्या गाडया बर्याच कालावधीपासून पोलीस ठाणे आवारात पडून आहेत. त्यांचे मुळ मालक मिळून येत नसल्याने प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे. तत्पुर्वी वरील नमुद वाहनांबाबत आजपर्यंत […]
इलेक्ट्रिक वायर आणि साहित्य चोरणार्या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील वारदोली येथील वाधवा वाईस सिटी मॅगनोलिया बिल्डींग परिसरात ठेवलेल्या लाखो रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वायर व इतर साहित्य चोरी केल्याप्रकरणी अवघ्या 24 तासात पनवेल तालुका पोलिसांनी चौकडीला गुन्ह्यातील गाडीसह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यातील येथील सुपरवायझर याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल […]
मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे यांनी दिल्या जीत व मानसी यांना लग्नाच्या शुभेच्छा
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे यांनी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या नातवाच्या शुभविवाहप्रित्यर्थ उपस्थित राहून वधुवरांना शुभेच्छा दिल्या. मानकोळी नाका येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यास महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांच्यासह उपस्थित होते. यावेळी त्यांनी जीत व मानसी यांना विवाहप्रसंगी शुभेच्छा […]
