4k समाचारउरण दि ५(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथे ग्रामसभा घेण्याच्या मुद्द्यावर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.मात्र पोलीस बंदोबस्त नसल्याने ग्रामसभा घेण्याचा निर्णय रद्द झाला आहे.दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी हनुमान कोळीवाडा गावात ग्रामसभा होणार होती मात्र आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस प्रशासनाने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना नोटीस पाठवून ग्रामसभा […]
पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात पोहोचविण्यात श्रुती म्हात्रे यांची महत्वाची भूमिका.
4k समाचारउरण दि ५(विठ्ठल ममताबादे )काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कट्टर व प्रामाणिक नेते दिवंगत शाम म्हात्रे यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांनी आजपर्यंतच्या केलेल्या सर्व कामाची दखल घेत तसेच पक्षासाठी दिलेले महत्वाचे योगदान लक्षात घेता श्रुती म्हात्रे यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी करण्यात आली आहे. वरिष्ठ पक्ष श्रेष्टीनी श्रुती म्हात्रे यांच्या नावावर शिक्का […]
पनवेल-उरण युवासेना पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त
4k समाचारउरण दि ४ (विठ्ठल ममताबादे )युवासेना हे शिवसेनेचे महत्वाचे अंग आहे.शिवसेनेत युवा सेनेला, युवा सेनेच्या कार्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मात्र शिवसेना(शिंदे गट )पक्षाचे आदेश मोडून पक्षाचे नियम पायदळी तुडवीणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आल्याने युवा सेनेत खुप मोठी खळबळ माजली आहे.युवासेनेच्या ठाणे येथील महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या काही स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांना त्यांची पदे बरखास्त […]
जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश
4k समाचार आर्थिक छळ आणि मानसिक त्रासामुळे शिक्षकांचे ११ ऑगस्टपासून आमरण उपोषणउरण दि ४(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू पोर्ट (शेवा )विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आता सहनशीलतेच्या पलीकडे पोहोचले आहेत. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी येत्या ११ ऑगस्ट, २०२५ पासून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. नव्याने […]
फुंडे हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
4k समाचारउरण दि २(विठ्ठल ममताबादे )तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवार दि. ०१ ऑगस्ट २०२५ रोजी लोकमान्यटिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. वर्गशिक्षक एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी-ब च्या वर्गाने या कार्यक्रमाची उत्तम तयारी केली होती. सुरुवातीलाच विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कृष्णाजी कडू, […]
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी उरणचे सुपुत्र शिक्षक प्रविण पाटील यांची निवड.
4k समाचारउरण दि २(विठ्ठल ममताबादे )शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो. २०२५ या वर्षी रायगड जिल्ह्यातून प्रवीण जनार्दन पाटील उपशिक्षक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदायलेवाडी तालुका उरण यांची निवड करण्यात आली आहे. प्रवीण जनार्दन पाटील यांची एकूण सेवा २८ वर्ष झालेली आहे. या सेवेत त्यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, […]
डॉ.विशाल नेहूल यांची बदली खालापूर येथे झाल्याने सर्वसामान्यांमध्ये हळहळ व्यक्त
4k समाचार उरण दि २(विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल यांची खालापूर जिल्हा रायगड ह्या विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक ह्या पदी बदली झाली आहे.त्यांच्या बदलीने सर्वसामान्य नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.नवी मुंबई पोर्ट विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल हे पोलिस विभागात उच्च पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सर्वांना […]
काॅ.भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा उत्साहात संपन्न
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )दि ३१ जुलै रोजी काॅ भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल उरण येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास रायगड-नवी मुंबईतील समाजाचे बहुतांश नेते, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातीलही उपस्थित होते. त्यात माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळूशेठ पाटील, […]
जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था उलवे तर्फे मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे ) जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था,उलवे यांच्या तर्फे जे.एम. म्हात्रे प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल मोरा – उरण या शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व गरीब गरजू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थे मार्फत २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन्सिल, पेन पट्टी आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.जाणीव सामाजिक […]
उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची यू ई एस उरण शाळेच्या कमेटी मध्ये उपाध्यक्ष म्हणून निवड.
उरण दि २5 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील अतिशय नावाजलेली उरण एज्युकेशन सोसायटी स्कूलअँड जुनिअर कॉलेज उरणच्या १ली ते १२वी च्या पालक शिक्षक संघ कमेटी ची २२/७/२०२५ रोजी निवडणूक झाली.त्यामध्ये उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, या निवडणुकी साठी १ ली ते १२ वी चे पालक प्रतिनिधी आणि शिक्षक व […]