4kNews कामोठे उरण, दि. 9(विठ्ठल ममताबादे) : ‘नाते मातीशी’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून खान्देश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने आयोजित ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. करंजा रोड येथील भारती बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला खान्देशी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवात सत्यनारायण महापूजा, स्नेहमेळावा, सामूहिक भोजन तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. खान्देशातून सेवामुक्त […]
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
4kNews कामोठे उरण, दि. 9(विठ्ठल ममताबादे) : विंधणे कोळीवाडा येथे ‘एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित, विंधणे’ या संस्थेचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. ६) कुलदैवत मंदिरासमोरील पटांगणात उत्साहात पार पडला. स्थानिक पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना व सवलतींचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात […]
धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात रात्रभर नामस्मरण, भजनाने भक्तिमय वातावरण; अनेक वर्षांची परंपरा कायम
4kNews कामोठे उरण, दि. 6(विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील धुतुम गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदाही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. धुतुम खालची आळीच्या वतीने शंकर मंदिरात पूजा, अभिषेक व धार्मिक विधी पार पडले. सामाजिक कार्यकर्ते समाधान कृष्णा कटेकर व भारती समाधान कटेकर यांच्या हस्ते सप्ताहाचा अभिषेक व पूजाविधी करण्यात आला. गावात सुख, शांती […]
उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
4kNews कामोठे उरण दि 31 (विठ्ठल ममताबादे )उरणमधील डाऊर नगरचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांनी मुंबईतील प्रतिष्ठित एनएमआयएमएस (NMIMS) विद्यापीठातून अभियांत्रिकी विषयात पीएच.डी पदवी संपादन करून उरण, रायगड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात त्यांना अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. या दिमाखदार समारंभास प्रमुख […]
नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी १२ कोटींहून अधिक गैरव्यवहाराचा संघर्ष समितीचा आरोप; २ सप्टेंबरला पंचायत समितीवर मोर्चाचा इशारा
4kNews कामोठे उरण, दि. ३० (विठ्ठल ममताबादे) : नागाव ग्रामपंचायतीच्या कारभारात विविध योजना, कर व विकासकामांच्या माध्यमातून कथित गैरव्यवहार व आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली. म्हातवली येथील माऊली रिसॉर्टमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत समितीने विविध पत्रव्यवहार, शासकीय कागदपत्रे […]
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे )नवीन शेवा व शेवा कोळीवाडा या दोन्ही विस्थापित गावांच्या प्रलंबित प्रश्नाला आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्रालय, मुंबई येथे रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट घेऊन ग्रामसुधारणा मंडळाच्या वतीने दोन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. माजी आमदार मनोहरशेठ भोईर व चंद्रकांत घरत […]
उरणच्या अभय धनाजी ठाकूर यांची थायलंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी.
4kNews कामोठे उरण दि 25 (विठ्ठल ममताबादे )थायलंडमधील चियांग माई येथे आयोजित UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत Taurus The Gym चे मालक अभय धनाजी ठाकूर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावल्याचे त्यांनी भारताची शान उंचावली आहे. त्यांच्या या यशामुळे खोपटे गाव,उरण तालुक्यासह रायगडच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विश्वविजेता अभय […]
नागपंचमीनिमित्त ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ जनजागृती
4kNews कामोठे उरण दि. 18 (विठ्ठल ममताबादे) : नागपंचमीनिमित्त सर्पांविषयीचे समज-गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती करण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर-उरण यांच्या वतीने ‘सर्प – समज, गैरसमज आणि विज्ञान’ या विषयावर तीन ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल, वाशी येथे तुषार म्हात्रे, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक […]
ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक व पुरोहित सुधाकर ठाकूर यांचे निधन.
4kNews कामोठे उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील खोपटे बांधपाडा परिसरातील हसमुख, मनमिळावू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व कैलासवासी सुधाकर केशव ठाकूर यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.सुधाकर ठाकूर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार व शिक्षण दिले. गिरोबा देवावर त्यांची नितांत श्रद्धा होती. श्रीक्षेत्र खोपटे ग्रामदेवता गिरोबा देवाची […]
द्रोणागिरी नोडसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची मागणी.
उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )सिडकोने नियोजनबद्ध पद्धतीने विकसित केलेल्या द्रोणागिरी (नोड) शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि मतदारसंख्या लक्षात घेता, द्रोणागिरी नोडसाठी स्वतंत्र मतदान केंद्र निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विविध ग्रामीण गावांच्या मतदान केंद्रांमध्ये विभागलेले द्रोणागिरी नोडचे शहरी मतदार एकत्र करून संपूर्ण द्रोणागिरी शहरासाठी स्वतंत्र मतदान केंद्र व स्वतंत्र निवडणूक व्यवस्था निर्माण […]
