नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

खारघरमध्ये धोकादायक जाहिरात फलकांचा प्रश्न ऐरणीवर!

4kNews  कामोठे

वाकलेले होर्डिंग आणि उघड्या विद्युत तारांमुळे अपघाताचा धोका; नंदू वारुंगसे यांची तातडीच्या कारवाईची मागणी
पनवेल, दि. 23(वार्ताहर) : खारघरमधील रस्त्यालगत उभारलेल्या काही जाहिरात फलकांची दुरवस्था आणि उघड्या विद्युत तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रौनक ॲडव्हर्टायझिंगच्या जाहिरात व्यवस्थेशी संबंधित असल्याचे सांगितले जाणारे काही फलक वाकलेल्या अवस्थेत असून, त्यांवरील विद्युत तारा उघड्या व अस्ताव्यस्त दिसत आहेत. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खारघरचे माजी उपशहरप्रमुख नंदू वारुंगसे यांनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.



रस्त्याच्या दिशेने झुकलेले जाहिरात फलक कोसळल्यास वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच उघड्या विद्युत तारांमुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित फलकांची संरचनात्मक व विद्युत तपासणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारुंगसे यांनी केली आहे.



जाहिरात फलकांच्या परवानग्या, सुरक्षितता आणि देखभालीची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास जबाबदारांवर कारवाई करावी. तसेच धोकादायक फलकांची तातडीने दुरुस्ती करावी किंवा आवश्यकतेनुसार ते हटवावेत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top