पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः शिवसेनेच्या प्रयत्नाने पनवेल शहरातील कब्रस्तान परिसरामध्ये साफसफाई मोहिम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. शिवसेना पनवेल शहर तर्फे गुलाब हुसेन बागवान (शिवसेना उप-विभाग प्रमुख) यांच्या प्रयत्नाने आज मोमीन पाडा मज्जिद च्या बाजूला असलेले कब्रस्तान हे काही दिवसांपासून अस्वच्छ म्हणजेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत आले होते आणि साफसफाई झाली नव्हती. यावेळी गुलाब […]
उपकेंद्राजवळील आग थोडक्यात आटोक्यात
पनवेल, दि.3 (वार्ताहर)4kNews ः पनवेल उरण रोडवरील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळील मोकळ्या जागेत लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आणल्याने पनवेल अंधारात जाता जाता वाचले.पनवेलमध्ये उरण नाका येथे महावितरण चे उपकेंद्र आहे.त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगली झाडे वाढली आहेत .त्या उपकेंद्राच्या आवारात आजूबाजूचे नागरिक कचरा देखील टाकतात.उपकेंद्र असल्यामुळे भूमिगत विद्युत तारा देखील तेथून गेल्या आहेत.त्याठिकाणी अशाच मोकळ्या जागी […]
शुभमंगल सावधान… यंदा लग्न सराईची जोरात धामधूम!
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः तुळसी विवाह संपन्न झाल्यानंतर दरवर्षी ग्रामीण व शहरी भागात इच्छूकांच्या लग्नसराईची धामधुम सुरु होते. तुळसी विवाह संपन्न झाल्यानंतर यंदा नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्तास सुरुवात झाली असून यंदा विवाहाचे जवळपास 69 मुहूर्त असणार आहेत. यापैंकी अनेक मुहूर्त हे डिसेंबर आणि मे या महिन्यात आहेत. वर्ष 2023 मध्ये मे महिन्यात विवाहाचे तब्बल 15 मुहूर्त […]
नाल्यात कोसळली मारुती सुझुकी इर्टीगा गाडी
पनवेल, दि.3 (वार्ताहर)4kNews ः खारघर वसाहतीमधील सेक्टर 6 येथे असलेल्या एका नाल्यात वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर मारुती सुझुकी इर्टीगा गाडी नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. खारघर सेक्टर 6 स्टेशन रोडकडे जाणार्या मार्गावरील प्रणाम हॉटेल समोर असलेल्या नाल्यात मुख्य रस्ता सोडून वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर गाडी ही नाल्यात कोसळली असून यात गाडीचे […]
पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी
साखरपुडा जमलेल्या जनसमुदायाने अनुभवला जिगरबाज नेता कार्यकर्त्यांच्याडोळयांच्या पाणवल्या कडा अजून विधानसभेचा गुलाल खाली बसला नाही तर शेकापचे नेते उरण विधानसभे मध्ये लढत देत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले नेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल तालुक्यातील तुराडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.वाघमारे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून कालच निवडणूक निकाल लागुन पराभव झाला असला तरी तो खेळाडू वृत्तीने […]
द्रोणागिरी येथे आरोग्य सेवा केंद्र सुरू करा
शेकाप नेते प्रितम म्हात्रेंची मागणी”जेएनपीटी
(4kNews) “शेकाप नेते प्रितम म्हात्रेंची मागणी”जेएनपीटी, दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशाप्रकारे मोठे उद्योग उरण परिसरात येत आहेत. तेथे येणाऱ्या रोजगारासाठी सुद्धा भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक नागरिक या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. सिडकोच्या माध्यमातून पुष्पकनोड, उलवे, द्रोणागिरी येथे मोठ्या प्रमाणात शहराची निर्मिती करण्यात आली. सिडकोने या ठिकाणी रस्ते, पाणी , वीज अशाप्रकारे सुविधा दिल्या आहेत परंतु […]
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट च्या वतीने निवारा नसलेल्याना ब्लॅंकेट वाटप
पनवेल /प्रतिनिधी(4kNews)सध्या थंडी ची लाट येऊ लागली आहे ,ज्यांना निवारा नाही असे बेघर नागरिक रस्त्यावर झोपताना तंडीत कुडकुडकत असतात अशा गरजू गरीब नागरिकांना पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे आणि श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट चे अध्यक्ष ऍड मनोहर सचदेव यांच्या संकल्पनेतून कामोठे स्टॉप ,खांदेश्वर रेल्वे स्थानक ,पनवेल बस डेपो समोरील रस्त्यावर .फुटपाथ वर […]
महायुतीच्या शपथविधीसाठी ठाकरे बंधूंना निमंत्रण
महायुतीच्या आगामी शपथविधीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. महायुतीने या निवडणुकीत मोठा विजय मिळवून बहुमत सिद्ध केले आहे. या निमंत्रणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू शपथविधीसाठी उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पत्नीने पतीला बेदम धुतले !
पुण्यातील सोमवार पेठेत मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून पत्नीने पतीला लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने बेदम मारहाण केली . चिडलेल्या पत्नीने पतीच्या करंगळीला चावा घेत नख तोडले आणि तोंड, गाल, पोटावर ओरखडे काढले. या घटनेमुळे घाबरलेल्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. ४४ वर्षीय पतीने आपल्या ४० वर्षीय पत्नीविरोधात त्रिशुंड गणपती मंदिराजवळील पोलीस ठाण्यात गुन्हा […]
छगन भुजबळ यांचे नाना पटोलेंवर आरोप
राज्यात महायुतीच्या सत्तास्थापनेला विलंब होत असल्याने आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीला फटका बसल्याचा ठपका ठेवत जुन्या वादांना उजाळा दिला. शिवसेना शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांच्या विधानांवरही भुजबळांनी टीका केली. सत्तास्थापनेसाठी भाजप नेते व्यस्त असल्याने विलंब होत असून लवकरच स्थिर सरकार स्थापन होईल, […]
