एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाल्याने सोमवारी सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. शिवसेना आमदारांची बैठकही पुढे ढकलण्यात आली. शिंदे ठाण्यात राहून आराम करणार असून दिल्लीतील भाजप बैठकीला त्यांचा सहभाग शक्य नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, 5 डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी अपेक्षित असला तरी मुख्यमंत्री आणि मंत्रिपदे याबाबत अजून निर्णय […]
मनसेतील दोन जिल्हाप्रमुखांमधील वाद राज ठाकरेंपर्यंत
मनसेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये निर्माण झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. अविनाश जाधव यांनी समीर मोर यांच्या भावाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मनसेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हा विषय थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या दरबारात पोहोचला आहे. आता या प्रकरणावर राज ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शर्वरी प्रमोद कांबळे हीची कोणी चौकशी साठी आल्यास त्यांना गोवंडी स्टेशन येथे पाठवावे.
नवी ्मुंबई (4kNews) कामोठे सेक्टर 12 येथे राहणारी शर्वरी प्रमोद कांबळे वय 8 वर्षे हि सध्या गोवंडी रेल्वे स्टेशन येथे भेटली असून ती फक्त्त कामोठे सेक्टर 12 एवढंच सांगते कोणी चौकशी साठी आल्यास त्यांना गोवंडी स्टेशन येथे पाठवावे.
निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेसाठी निमंत्रण
भारताच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या मतदानातील तफावतीबाबतच्या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत पक्षाला मंगळवार, ३ डिसेंबर रोजी चर्चेसाठी बोलावले आहे. ईसीआयने म्हटले आहे की, काँग्रेसच्या सर्व कायदेशीर समस्यांचे पुनरावलोकन करून त्यावर लेखी उत्तर देण्याचे आयोगाने आश्वासन दिले आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेतही पारदर्शकता असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून काँग्रेसच्या समस्यांवर योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.
ऐरोली
नवी मुंबईः बॉम्बस्फोटाची धमकी; १ अटकेत
मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देणाऱ्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याने दारूच्या नशेत पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून ही धमकी दिली होती. धमकीचा फोन कंट्रोल रूमला येताच फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. मोबाईल नंबरवरून पोलिसांनी त्याच्या राहत्या ठिकाणाची माहिती मिळवली असता, तो सापडला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला […]
डॉ. अपूर्व हिरे आणि मानसिंग नाईक अजित पवार गटात !
शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे आणि श्रीगोंदा विधानसभेतील अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे. तसेच, शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार मानसिंग नाईक देखील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. या भेटींमुळे दोघेही अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. […]
गळफास घेऊन मुलीची आत्महत्या
१४ वर्षीय मुलीने रात्रीच्या दरम्यान करंबळी येथील खेळाच्या मैदानाच्या बाजूला असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दिली. आरोपी सुनील भगत याने मुलीला लग्नाचे वचन दिले होते. मात्र, त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तणावाखाली आल्याने मुलीने गळफास घेतला.
ईव्हीएम हॅकिंगचा आरोपः अमेरिकेतील व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकेतील व्यक्तीविरोधात मुंबई सायबर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सय्यद शुजा असे या व्यवतीचे नाव आहे. शुजाच्या दाव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम हॅकिंगबाबत राज्य आणि देशभर […]
वाशीत बारवर कारवाई
वाशीतील संडे बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्या ठिकाणी महिला वेटर ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वाशी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता, बेकायदेशीरने डान्सबार चालवला जात असल्याचे तसेच अश्लील हावभाव करून नृत्य सादर करत असल्याचे दिसून आले. त्यावरून बारवर कारवाई करून संबंधितांवर वाशी पोलिसांनी गन्हा दाखल केला आहे.
मनोज जरांगेंचा मराठा समाजाविषयी खुलासा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी मराठा समाजाचे उमेदवार उभे केले असते तर इतर सर्वांचा सुपडासाफ झाला असता. मी मराठा समाजाचा सच्चा सेवक आहे. मराठा समाज कोणाच्याही दावणीला बांधणार नाही. समाज मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही, असा खुलासा मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. मी आणि […]
