नवीन बातम्या
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Tag: #Kamothe #Panvel

*करंजाडे येथे मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम संपन्न*

पनवेल दि. ०७ ( संजय कदम ) : करंजाडे येथे मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम मायबाप प्रेक्षकांच्या साथीने  संपन्न झाला .      यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सिने लेखक- दिग्दर्शक ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक केदार शिंदे  यांचे छोटे बंधू मंदार शिंदे ,रेडिओ प्रतिनिधी आकाशवाणी- मुंबईच्या परिणीता सावंत , रंगभूषा-नेपथ्य दिग्दर्शक झी 24 तास- एस्सेल ग्रुप मुंबईचे […]

सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनीच्या वतीनेउद्योजक रामदास शेवाळे यांना  “मराठा भूषण” पुरस्कार प्रदान

पनवेल दि.०६ (वार्ताहर) : सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून मराठा समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील जनसेवक उद्योजक मा. रामदास शेवाळे यांना यावर्षीचा ‘मराठा भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी, पनवेल यांच्या वतीने संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला.  वर्धापन दिन सोहळा […]

ऑनलाईन गेमिंगद्वारे सायबर फसवणुक करणा-या १२ गुन्हेगारांच्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने केले गजाआड 

4k समाचार पनवेल दि.०६(वार्ताहर):  राज्यात सर्वत्र राष्ट्रीय सायबर सुरक्षा सप्ताह सुरु असून याच सप्ताहात प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंग द्वारे फसवणूक करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांनी उध्वस्त केली आहे. टोळीतील १२ जणांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी देशभरातील विविध बँकेच्या ८८६ खात्यांचा वापर केल्याचे निष्पन झाले आहे. शिवाय त्यांच्या विरोधात भारतातील एन.सी.सी.आर.पी. पोर्टलच्या एकुण ३९३ तकारी […]

खारघर मधील अधिराज टॉवरच्या ५१ व्य मजल्यावर लागली भीषण आग

4k समाचार पनवेल दि.०६(वार्ताहर): खारघर, सेक्टर ३६ येथील ५५ मजली ‘अधिराज कॅपिटल सिटी’ टॉवरमध्ये रात्री ५१ व्या मजल्यावरील एका बंद अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ आपत्कालीन मार्गाचा वापर करून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले होते. मात्र, पनवेल परिसरात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे परिसरातील आगीचे […]

  ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त नविन पनवेलमध्ये भव्य समूहगायन कार्यक्रम 

4k समाचार दि. 6 पनवेल (प्रतिनिधी) स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार येत असून त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०४ वाजता नविन पनवेल मधील के. ए. बांठिया विद्यालय येथे ‘वंदे मातरम’ […]

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर रायगडची जबाबदारी!; लोकनेते रामशेठ ठाकूर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख

4k समाचार दि. 6 पनवेल (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत. सर्वात अगोदर नगरपरिषदा आणि नगरपालिकेसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आणि संपूर्ण रायगडचे निवडणूक प्रभारी म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. निवडणूक व्यवस्थापनामध्ये त्यांचा हातखंडा […]

सारस्वत रत्न’ पुरस्कार पनवेलमधील उद्योजक मंगेश परूळेकर यांना प्रदान

‘4k समाचार दि. 5 पनवेल दि.३० (वार्ताहर) : सारस्वत चेंबर्सचा २०२४ चा ‘सारस्वत रत्न’ पुरस्कार पनवेलमधील उद्योजक मंगेश परूळेकर यांना नुकताच देण्यात आला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व डेंन्पो यांच्या हस्ते हा पुरस्कार परुळेकर यांना प्रदान करण्यात आला.   सिन्नपुरूष येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. पनवेलमधील ओरायन मॉल आणि एमपी बिल्डर्सचे मालक मंगेश […]

वाढत्या घनकचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कार्यवाही करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी

4k समाचार दि. 5

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील वाढत्या घनकचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे निवेदनाद्वारे केली आहे. पनवेल परिसरातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कचरा व्यवस्थापनाची समस्या तीव्र होऊ नये या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना दिलेल्या निवेदनात तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. निवेदनात आमदार […]

पनवेलमध्ये गोदरेज कॅपिटलची नवीन गृहवित्त मोहीम

4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने त्यांच्या उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्समार्फत ‘पक्कापता’ अर्थात मालकीचे घर ही नवीन मोहीम सुरू केली आहे. पनवेलसह देशातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परवडणाऱ्या गृहवित्त उपाययोजना पुरवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  ही मोहीम पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या भावनिक प्रवासाचे सुंदर चित्रण करते. […]

लवकरच ‘अटल करंडक एकांकिका’ स्पर्धेच्या १२ व्या पर्वाचा शुभारंभ
०६ नोव्हेंबरपासून राज्यातील केंद्राची प्राथमिक फेरी

4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका’ स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष असून त्या अंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्रांच्या प्राथमिक फेरीला ०६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे.  […]

Back To Top