पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः राहत्या घरातून एक तरुणी कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. निकिता रामदास कातकरी (21 रा.पळस्पे गाव) असे या तरुणीचे नाव असून बांधा मजबूत, चेहरा गोल, डोळे काळे, नाक बसके, उंची 4 फुट असून अंगात चॉकलेटी रंगाचा टॉप व पांढर्या […]
शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे निधन
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल महानगरपालिका सह संपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी तळोजा भोईरपाडा येथील राहत्या घरी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाळाराम मुंबईकर यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तळोजा विभागप्रमुख आणि पनवेल उपतालुकाप्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. 1967 पासून शिवसेनेत सक्रिय असून, पक्ष स्थापनेपासून […]
नेहरू सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने ओरियन मॉल, पनवेल येथे मुलांसाठी विज्ञान प्रदर्शन
पनवेल, दि.15 (संजय कदम) ः नेहरू सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने ओरियन मॉल, पनवेल येथे 25 मे 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात भेट देण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी आवाहन ओरियन मॉलच्या वतीने मंगेश परुळेकर व मनन परुळेकर यांनी केले आहे. हे विशेष प्रदर्शनी विज्ञान शिक्षणामध्ये जिज्ञासा वाढवण्यासाठी आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा […]
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑल आऊट दरम्यान मोठ्या प्रमाणात कारवाई
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑलआऊट केल्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 चे प्रशांत मोहिते, सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभागचे अशोक राजपूत, वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.शाकीर पटेल व अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत नवनाथ नगर झोपडपट्टी, रेल्वे […]
शिवसेना उपनेते व संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळेचा 10 वी चा निकाल 100%
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः शिवसेना उपनेते व कमळ गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था तळोजाचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळांचा निकाल 100% लागल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामध्ये द इलाईट पब्लिक स्कूल (सीबीएसई बोर्ड ), द इलाईट पब्लिक स्कूल ( स्टेट बोर्ड), कै.कमळ पाटील माध्यमिक विद्यालय, अनुसया बबनदादा पाटील माध्यमिक विद्यालय या शाळांचा […]
धावत्या बसमध्ये चोरी करणारा अटकेत
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः मुंबई पूणे द्रुतगती महामार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल्स बसमधील महिला प्रवाशांची पर्स चोरीतून लाखोंचा मुद्देमाल चोरणार्या चोरट्याला कामोठे पोलिसांच्या पथकाने अखेर अटक करुन त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात केली. मूळ गुजरात येथे राहणारा आकाश पटेल असे या 32 वर्षीय संशयीत चोरट्याचे नाव आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात चार वेगवेगळ्या चोरीच्या घटनांची नोंद […]
टँकर मधील डिझेलची चोरी
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः कर्नाटकातून तळोजा परिसरात माल खाली करण्याकरितां आलेल्या टँकरमधून डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. विजयकुमार अजोरपाल हे ठाणे जिल्ह्यात राहत आहेत. हे कळंबोली येथील टैंकर क्रमांक एमएच 43 सी.ई 1688 या गाडीवर टैंकर चालक […]
डेब्रीज टाकण्यासाठी आलेले 4 डंपर जप्त; चालकांवर कारवाई
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः ’सिडको’ने संपादित केलेल्या जमिनीवर आणि भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक तसेच पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रीज टाकणार्या डंपर चालकांची ’सिडको’ कडून धरपकड सुरुच आहे. उलवे परिसरातील ’सिडको’ च्या मोकळ्या भूखंडावर डेब्रीज टाकण्यासाठी आलेले 4 डंपर ’सिडको’ च्या पथकाने उलवे येथील अटल सेतू जवळ पकडले. त्यानंतर सदर 4 डंपर चालकाविरोधात उलवे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा […]
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण करून ब्लेडने केले चेहर्यावर वार
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः दारु पिण्यासाठी आरोपीने पैसे मागितले असता ते न दिल्याने आपसात संगनमत करून सदर रिक्षा चालकास मारहाण करून तसेच ब्लेडने चेहर्यावर वार करून त्याला जखमी केल्याची घटना रेल्वे स्टेशनच्या आवारात साई मंदिराजवळ घडली आहे. रिक्षा चालक आशिक आलम शेख (35 रा.नवनाथ झोपडपट्टी) याच्याकडे चार अनोळखी इसमांनी दारु पिण्यासाठी पैसे मागितले असता त्याने […]
होंडा अॅक्टीव्हा स्कुटीची चोरी
पनवेल, दि.13 (संजय कदम) ः पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅण्डच्या जवळ उभी करून ठेवलेली होंडा अॅक्टीव्हा स्कुटी गाडीची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना घडली आहे. केतन गोसावी यांची 10 हजार रुपये किंमतीची होंडा अॅक्टीव्हा स्कुटी गाडी क्रं.एमएच-06-एटी-4152 काळ्या रंगाची ही सदर ठिकाणी उभी केली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस […]