पनवेल दि.११(प्रतिनिधी):”भावभावनांचा कल्लोळ प्रत्येकाच्या मनात असतो.त्याला शब्दरूप मिळून त्याचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रत्येकाने लिहिते झाले पाहिजे.” असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ गजल- कार ए.के.शेख यांनी काढले.येथील के. गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद- शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काल,शनिवारी वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,” पनवेलनगरी […]
*करंजाडे शहरात शिवसेनेच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली💐!*
आज दिनांक ११ मे २०२५ रोजी, करंजाडे शहरामध्ये शिवसेना करंजाडे शहर विभागातर्फे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना अत्यंत श्रद्धेने आणि कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना करंजाडेच्या वतीने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर ५, करंजाडे, या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. विनोदजी साबळे साहेब, उरण विधानसभा सचिव श्री. हितेश नाईक, तालुका संपर्क […]
पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे अवैध धंद्यांवर कारवाई
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्यांना चांगलाच दणका दिला आहे. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 प्रशांत मोहिते, सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभागाचे अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे व त्यांच्या पथकाने हद्दीतील कोनगाव, वावंजे, वाकडी, नेरे या […]
*ज्वेलर्सच्या दुकानातून बुरखाधारी महिलेनें केली चोरी*
पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल शहरातील विनायक ज्वेलर्स या दुकानात आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात महिलेने हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे. सदर महिला या दुनाकात येऊन तिने सोन्याच्या कडा दाखवण्यास सांगून नंतर हातचलाखीने जवळपास २ लाख रुपये किमतीचा सोन्याचा कडा हा तिच्या कडील बाजूस हाताच्या बोटाने ढकलून तो बुरख्या वरती पडल्यावर तो बुरख्याच्या खिशामध्ये […]
बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : मे महिना म्हणजे चोरट्यांचा सुगीचा काळ. या कालावधीत बहुतेक कुटुंब आपल्या मुळ गावी अथवा बाहेरगावी फिरण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरी हेरून ते पूर्णपणे साफ करतात. या सुट्टीच्या हंगामात चोरट्यांचा सुळसुळाट वाढून चोरी, घरफोडी सारख्या घटना घडत असल्याने नागरिकांनी सुट्टीच्या हंगामात बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन […]
उलवे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत मोठी कारवाई
पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : शहरातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याबरोबरच बेकायदेशीर कृत्य आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विविध भागात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवून बेकायदेशीर कृत्य करणारे, अवैध धंदे करणारे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे […]
*अचानकपणे आलेल्या पावसामुळे पनवेलकर सुखावले*
पनवेल दि.०७(वार्ताहर): गेल्या काही दिवसांपासून तापमानाने अक्षरशः कहर केला होता. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा आणि दमट हवामान यामुळे नागरिक हैराण झाले होते. पण आज दुपारी सुमारे बारा वाजता आकाश अचानक गडगडू लागलं, विजा कडाडू लागल्या आणि काही क्षणांतच जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त झालेल्या पनवेलकरांसाठी हा पाऊस एक सुखद गारवा घेऊन आला. गेल्या […]
इनरव्हील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय महिला संस्था आहे या संस्थेमार्फत समाजातील वेगवेगळ्या स्तरातील महिला एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीतून अनेक वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवितात .
असाच इनरव्हिल मार्फत दरवर्षी राबविला जाणारा उपक्रम म्हणजे ” हॅपी स्कुल ” . या उपक्रमाअंतर्गत क्लब मार्फत आपल्या जवळच्या परिसरातील जिल्हा परिषदेची एखादी गरजु शाळा निवडून तेथे त्या शाळेला आवश्यक असणाऱ्या बाबींची स्वनिधीतून पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो . असाच एक हॅपी स्कुल बनविण्याचा उपक्रम इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या मार्फत नानोशी […]
*अवकाळी पावसाचा फटका; काही ठिकणी लागल्या आगीसह वृक्ष पडले उन्मळून*
पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल मध्ये अचानकपणे मंगळवारी रात्री तसेच बुधवारी धुपरी अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाचा फटका शहरी भागासह ग्रामीण भागाला बसून काही ठिकाणी आगी लागण्याचे प्रकार तर काही ठिकाणी मोठं मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. आज करंजाडे ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सर्वर बॉक्सला आग लागली होती याची माहिती […]
माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण
पनवेल(प्रतिनिधी)किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालय पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. सन १९९३ साली १० वी पास झाल्यानंतर आय टी आय ला प्रवेश घेतला तीन वर्ष आय टी आय च प्रशिक्षण पूर्ण करून लगेचच सन १९९६ साली आर्मी मध्ये भरती झाले. आणि सन २०१३ साली १६ […]