पनवेल (प्रतिनिधी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास भाजप सोशल मीडियाचे राष्ट्रीय समन्वयक […]
संत शिरोमणी रोहिदास जयंती निमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला .
संत शिरोमणी रोहिदास जयंती उत्सवाच्या निमित्ताने चर्मकार समाज रायगड प्रतिष्ठान पनवेल तालुक्याच्यावतीने लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला . यावेळी पनवेल तालुका चर्मकार समाजाचे अध्यक्ष विजय मोहोकर, माजी नगरसेवक व रायगड जिल्हा चर्मकार संघटनेचे माजी अध्यक्ष अरविंद सावळेकर, लक्ष्मण कल्याणकर, प्रवीण मोहोकर, विलास उरणकर, भूषण कल्याणकर, सचिन उरणकर आदी उपस्थित […]
रविवारी कामोठेत लीग बॉक्स क्रिकेट सामने
पनवेल (प्रतिनिधी) प्रदीप भगत युवा मंच प्रभाग ११ यांच्या विद्यमाने रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत कामोठे येथे सोसायटी प्रीमिअर लीग बॉक्स क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर २२ मधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्या संघाला १० हजार रुपये व चषक तर उपविजेत्या संघाला ५ […]
देहरंग धरण उंची वाढवण्याच्या नियोजित प्रकल्पाला आर्थिक पाठबळ द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गाढी नदीवरील देहरंग धरणाची उंची वाढविण्याच्या नियोजित प्रकल्पास आर्थिक पाठबळ देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिकेची स्थापना ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली […]
शिवजयंतीनिमित्त उलवे नोडमध्ये “महाराष्ट्राची महासंस्कृती”
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा कलाविष्कार असलेला “महाराष्ट्राची महासंस्कृती” या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर १२ मधील प्लॉट क्रमांक ६ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल […]
अखेर कु. सृष्टीच्या कुटुंबाना मिळाला न्याय..
उरण /प्रतिनिधी :पनवेल तालुक्यातील तामसई येथील कु. सृष्टी राजू शिद ही उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रमाशाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होती. अचानक तिच्या पोटात दुखायला लागले. कु. सृष्टी आणि तिच्या मैत्रिणींनी आश्रमशाळेतील असणाऱ्या शिक्षकांना सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर काही तासाने कु. सृष्टीला उपचारासाठी पनवेल येथे नेण्यात आले. उपचार चालू असताना मृत्यूची झुंज देत […]
कोकणचो रुबाब भारी या मालवणी नाटकाने जिंकली रसिकांची मने
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ , पनवेल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात संपन्न झाले. डॉ. भगवान बिरमोळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून […]
पनवेल शहर पोलिसांतर्फे इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी व कर्मचार्यांना नवीन कायदा सायबर फ्रॉड व नवी मुंबई व्हॉटसअप चॅनेल बाबत करण्यात आले मार्गदर्शन
पनवेल, दि.13 (संजय कदम) ः नवीन कायदा व सायबर जनजागृती कार्यक्रमांतर्गत पनवेल शहर पोलिसांतर्फे इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी व कर्मचार्यांना नवीन कायदा सायबर फ्रॉड व नवी मुंबई व्हॉटसअप चॅनेल बाबत मार्गदर्शन करण्यात आले. वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड.सचिन पटेल यांनी उपस्थितांना नवीन कायद्याविषयक मार्गदर्शन केले. तर पो.नि.शाकीर पटेल यांनी पोलीस जनता समन्वयक मार्गदर्शन केले. […]
परदेशी तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करुन राहत असल्याचे निदर्शनास आल्यास सुजाण नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा वपोनि गजानन घाडगे
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत परदेशी तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करुन राहत असल्याचे निदर्शनास आल्यास सुजाण नागरिकांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे मध्ये तात्काळ समक्ष येऊन अथवा फोन द्वारे माहिती द्यावी, असे आवाहन ‘पनवेल तालुका पोलीस ठाणे’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे केले आहे. पनवेल महापालिका हद्दीत विना परवानगी भरवल्या जाणार्या […]
सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी तर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व डॉ.नैना पटेल यांचे महिला आरोग्य मार्गदर्शन, सायं.4 ते 8 या दरम्यान. रविवार दि.16 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजक कच्छ युवक संघ पनवेल सकाळी 10 […]
