4k समाचार पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी साऱ्यांची लगबग सुरू झाली असून विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या या सणानिमित्त आकाश कंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहे. हे आकर्षक आकाशकंदील लक्ष वेधून घेत असून यावर्षी […]
सराईत सोनसाखळी इराणी चोराला पोलिसांकडून फिल्मी स्टाईल केले गजाआड
4k समाचार पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : पनवेलसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात मोठ्या प्रमाणात चैन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी अत्यंत मुळापर्यंत जाऊन तपास केले.बातमीदार त्याचबरोबर तांत्रिक बाबींचा अवलंब करत सराईत सोनसाखळी चोराला अखेर जेरबंद करण्यात आले. पनवेल व नवी मुंबई परिसरात गाडीवर येऊन […]
इसम बेपत्ता
4k समाचार पनवेल दि. 06 ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील बापदेववाडी, पो. वाजे येथून एक इसम कोठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . या इसमाचे नाव सुनिल सुधाकर शिरसाठ, वय २५ वर्षे,असे असून शरीर बांधा सडपातळ, रंग सावळा, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चहरा गोल, […]
विद्यार्थ्यांचे वाहतूक नियमनाबाबत प्रबोधन
4k समाचार पनवेल दि. 06 ( वार्ताहर ) : सेंट झेवियर स्कूल, कोनगाव या शाळेतील आठवी, नववी, दहावी वर्गातील जवळपास ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्याकडून प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन आणि रस्ते सुरक्षा विषयक माहिती देण्यात आली. सायबर गुन्ह्यांबाबत आणि सायबर हेल्पलाईन १९३० बाबत माहिती दिली. सोशल मीडियाचे फायदे-तोटे, […]
विमानतळाला दिबांचे नाव उदघाटनादिवशीच जाहीर करा – विजय शिरढोणकर
4k समाचार पनवेल दि. 06 ( वार्ताहर ) : प्रकल्पग्रस्तांचे कणखर नेतृत्व, स्त्री भ्रूण हत्ये विरोधी कायद्याचे जनक तसेच सिडकोविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारे पनवेल नगरपालिकेचे माजी नागराध्यक्ष, ५ वेळा आमदार आणि २ वेळा खासदार राहिलेले लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांच्यावर प्रेम करणारे पनवेल, उरण आणि नवीमुंबई परिसरातील नागरिक नव्याने उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. […]
बाबासाहेब लीगल पँथर या संघटनेच्या माध्यमातून चौक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
4k समाचार पनवेल दि. 06 ( वार्ताहर ) : बाबासाहेब लीगल पँथर या संघटनेच्या माध्यमातून चौक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, चौक, च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर यास बाबासाहेब लेकर पॅंथर चे अध्यक्ष प्राध्यापक प्रफुल्ल भोसले, उपाध्यक्ष एडवोकेट नीलम प्रफुल्ल भोसले, संघटनेचे सचिव शशिकांत सातपुते साहेब, कोषाध्यक्ष कृणाल कदम साहेब व विभागीय समन्वयक […]
महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तात्काळ लाभ द्या
– माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी
4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी ) पनवेल महानगरपालिका मधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तात्काळ लाभ देण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. . माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी तसेच […]
आत्मनिर्भर भारतमुळे देशाची ताकद वाढणार- आमदार स्नेहा दुबे-पंडित
4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) आत्मनिर्भर भारतमुळे देशाची ताकद वाढणार असून त्या जोरावर आपला भारत विकसित देशांच्या यादीत सामील होईल, असे प्रतिपादन आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाच्या प्रदेश सहसंयोजिका वसई मतदार संघाच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी आज (दि. ०३) येथे केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान २५ सप्टेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान […]
सामाजिक बांधिलकी जपणारा माजी नगरसेवक विजय खानावकर यांचा रॉयल वाढदिवस
4k समाचार पनवेल ता. 5 (प्रतिनिधी)कळंबोली परिसरातील “रॉयल मॅन” म्हणून परिचित असलेले माजी नगरसेवक विजय मनोहर खानावकर यांनी यंदाचा आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साधेपणाने आणि जनसेवेच्या माध्यमातून साजरा केला. विजयादशमीच्या शुभदिनी (ता. 2 ) त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व […]
पनवेल प्रशासकीय भवनाच्या दुरवस्थेमुळे सामान्य नागरिकांची परवड; शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वात पनवेल शिवसेनेकडून निषेध
4k समाचार पनवेल दि.०5(वार्ताहर): पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे १५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ‘प्रशासकीय भवना’ची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, येथे येणाऱ्या सामान्य नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. या दुरवस्थेबद्दल शिवसेना पनवेल महानगर-जिल्हा शाखेचे स्थानिक व अनुभवी नेते चंद्रशेखर सोमण यांनी उपविभागीय (प्रांत) अधिकारी,पनवेल पवन चांडक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन जाहीर निषेध […]