4kNews कामोठे दि. 2 नवी मुंबई (प्रतिनिधी) भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाईफ इन्शुरन्सने २०२६ च्या पॅरा स्पोर्ट्स सीझनसाठी भारतीय पथकाचे ‘प्रिन्सिपल पार्टनर’ म्हणून पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडिया (पीसीआय) सोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गत ग्लासगो येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ पॅरा गेम्स २०२६ तसेच जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या […]
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन
4kNews कामोठे दि. 2पनवेल(प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीने “ऋतू हिरवा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या विविध छटांचा अनुभव देणारा हा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे. […]
पनवेल शहर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट कागदपत्रांच्या आधारे २.२९ कोटींची जमीन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
4kNews कामोठे पनवेल, दि. 2 (वार्ताहर) पनवेल शहर पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री करून तब्बल २ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला […]
मानवता फाउंडेशनतर्फे दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप; वृक्षारोपणातून निसर्ग संवर्धनाचा संदेश
4kNews कामोठे दि. 2 पाच्छापूर (सुधागड) : सामाजिक बांधिलकी जपत मानवता फाउंडेशनच्या वतीने सुधागड तालुक्यातील दुर्गम भागातील सोमजाई शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय, पाच्छापूर येथील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत ये-जा करताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष संजयभाऊ पवार, उपाध्यक्ष विनोद नायर, सचिव विघ्नेश मगानी, संस्थेचे […]
*वर्षावास निमित्त धम्म बांधवांची गृह भेट उपक्रम*
4kNews कामोठे दि. 2 पनवेल: दिनांक २९ जुलै २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने वर्षावास (आषाढी पौर्णिमा) निमित्त धम्म बांधवांची गृह भेट हा उपक्रम उत्साहात पार पडला. तथागत बुद्धांच्या पहिल्या उपदेश दिनानिमित्त (धम्मचक्क पवत्तन सुत्त) आयोजित या कार्यक्रमास धम्म बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब […]
पनवेलच्या विकास आराखड्याला गती; नगररचना संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
4kNews कामोठे दि. 2 पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांचा विकास आराखडा, शहराचे नियोजन , बांधकाम परवानग्या व लेआऊट मंजुरी तसेच विकासकांना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात विविध विषयांवर नगररचना संचालनालयाचे संचालक मा. श्री. जितेंद्र भोपळे यांची भेट घेऊन सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली. या बैठकीस पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीनजी पाटील,मा. सभागृह नेते तथा नगरसेवक श्री. परेशशेठ ठाकूर […]
पनवेल पदाधिकारी राहुल गोगटे यांच्या प्रयत्नाने वैद्यकीय मदत कक्षातून रुग्णास मिळाली ५८ हजारांची बिलातून सूट
4kNews कामोठे दि. 2 पनवेल / प्रतिनिधी : -संजय कदम पनवेल तालुक्यातील जाताडे या गावी राहणारा श्लोक किशोर म्हात्रे या सहा वर्षाय मुलगा घरात खेळताना पडला असता त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. मुलाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ठीक नसताना देखील त्यांनी नवी मुंबई बेलापूर अपोलो हॉस्पिटल येथे उपचारासाठी ठेवले.अशा परिस्थिती मुलाचे वडील किशोर म्हात्रे यांनी शिवसेना […]
पनवेलच्या इतिहासात प्रथमच शासकीय स्तरावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ; सभागृह नेते अँड. प्रकाश बिनेदार यांच्या संकल्पनेला यश
“जयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्याचा दिवस” – महापौर नितीन पाटील
4kNews कामोठे दि. 2 पनवेल :(साबीर शेख)- पनवेल महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय स्तरावर अत्यंत दिमाखात साजरी करण्यात आली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित या भव्य सोहळ्याची संकल्पना सभागृह नेते अँड. प्रकाश बिनेदार यांनी मांडली होती. त्यांच्या या प्रस्तावाला महापौर नितीन पाटील यांची तत्काळ मान्यता मिळाली, तर आमदार प्रशांत […]
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत विद्यार्थ्यांसाठी विदुषी शुभदा पराडकर यांचे विशेष मार्गदर्शन
4kNews कामोठे दि. 30 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका व विदुषी शुभदा पराडकर या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. संगीत […]
चाळीशीनंतर पेरिमेनोपॉजच्या तक्रारींमध्ये वाढ; हार्मोन थेरपीकडे महिलांचा वाढता कल ः प्रसुती व स्त्रीरोगतज्ञ डॉ.सुरभी सिद्धार्थ
4kNews कामोठे पनवेल, दि. 30 (वार्ताहर) ः चाळीशीनंतर महिलांमध्ये पेरिमेनोपॉजशी संबंधित तक्रारी वाढत असून, वेळेवर निदान आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. हार्मोनल आरोग्याबाबत वाढती जागरूकता आणि सोशल मीडियावरील माहितीमुळे अनेक महिला हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी या उपचारपद्धतीकडे वळत आहेत. खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ […]
