4k समाचार उरण दि.१३ (विठ्ठल ममताबादे)राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वाद पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहेत. व शासनाच्या GR(शासन निर्णय )प्रमाणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामूळे ओबीसी प्रवर्गात असलेल्या विविध जाती उपजाती यांच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात प्रवेश […]
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश.
4k समाचार उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा (भाप्रसे) यांचे राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील हजारो सफाई कामगारांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी संचालक कार्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी देणे बाबत चर्चा झाल्यानंतर वारसा हक्काने नियुक्ती […]
प्रकल्पग्रस्त विस्थापित मच्छीमारांचे पुनर्वसन डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणार
4K समाचार उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे ) शेवा कोळीवाडा, उरण येथील सुमारे २५६ विस्थापित मच्छीमार कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला. शेवा कोळीवाडा पुनर्वसन संदर्भात याचिका माननीय मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन तर्फे दाखल करण्यात आली असून दिनांक ४/९/२०२५ रोजी मा. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व मा. न्यायमूर्ती संदेश […]
काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विनोबा भावे यांना अभिवादन!
4k समाचार उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे )भूदान चळवळीचे प्रणेते आणि भूदान चळवळीद्वारे भूमिहीनांना जमिनी देणारे, ‘भारतरत्न’ विनोबा भावे यांची जयंती गुरुवारी (ता. ११) पेण येथील त्यांच्या जन्मगावीगागोदे बुद्रुक येथे साजरी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विनोबा भावे यांना अभिवादन केले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, ”विनोबा भावे महान होते. त्यांनी जगाला […]
मे.आय.एम.सी.लि. जेएनपीटी, न्हावा शेवा येथे कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपन्न.
4k समाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )मे.आय.एम.सी.लि., जेएनपीटी, न्हावा शेवा, ता.उरण, जि. रायगड मधील कामगारांच्या वेतनवाढीचा करार शनिवार दि.०६/०९/२०२५ रोजी संपन्न झाला. सदर कंपनी वेगवेगळ्या प्रकारची रसायने, खाद्यतेले याचा मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठा करीत असते. आवश्यकतेनुसार ग्राहक आपला माल घेऊन जात असतो. यामधून कंपनीला भाडे पोटी मोठा नफा होत असतो. सदर कंपनी मध्ये कोकण श्रमिक संघ […]
जनसुरक्षा कायद्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे उरण मध्ये निदर्शनें.
4k समाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे)जनसुरक्षा कायदा विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर केला व राज्यपालांच्या सही साठी गेला आहे.हा कायदा मंजूर करु नका हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नसुन जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर लढणाऱ्या पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाकण्याकरिता आणला जात आहे असे परखड मत भारत जोडो अभियानच्या राष्ट्रीय समन्वयक उल्का ताई महाजन यांनी व्यक्त केले.जनसुरक्षा […]
उरण महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न
4 k समाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उरण रेल्वे स्टेशन परिसर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ या महाराष्ट्र शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या निर्देशान्वे महाविद्यालयातीच्या वतीने हा उपक्रम राबवला गेला. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वाल्मीक […]
उप विभागीय पोलिस अधीक्षक डॉ विशाल नेहूल यांनी आदिवासी कुटुंबाला दिला न्याय
4k समाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )मौजे कुंभिवली तालुका पनवेल येथील सर्वे नंबर ५४/२ क्षेत्र ०.५८.६० हे.आर. ही जमीन मिळकत आदिवासी खातेदार राघो नारायण वीर यांचे नावे सात बारा सदरी आणि प्रत्यक्ष ताबे कब्जात होती. सन २०१२ मध्ये तत्कालीन तलाठी सुनील बांगर ( सध्या विश्वनिकेतन कॉलेजचे विश्वस्थ) यांनी तत्कालीन पोलिस पाटील हरी दामोदर वीर हा […]
विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबत विशिष्ट कलाअंगी जोपासावी – गणेशप्रसाद गावंड
4k सामाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )शिक्षण प्रेमी कै. विठाबाई शिवराम म्हात्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक वारसा जपणारे कलाकार यांचा विशेष गुणगौरव कार्यक्रम आवरे गावातील प्रसिद्ध अंनतभूवन सभागृहात पार पडला. उत्कृष्ट कलाकार सम्राट नित्यानंद म्हात्रे यांनी सी बी एस सी परीक्षेत विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल तसेच कौस्तुभ आल्हाद म्हात्रे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड […]
मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका
4k समाचार उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार जात नोंदींमध्ये होत असलेला फेरफार थांबवावा, या मागणीसाठी “शिवा” अखिल भारतीय वीरशैव युवक संघटने तर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेचा स्टॅम्प क्रमांक […]