पनवेल दि.०७(वार्ताहर): गेल्या काही दिवसांपासून तापमानाने अक्षरशः कहर केला होता. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा आणि दमट हवामान यामुळे नागरिक हैराण झाले होते. पण आज दुपारी सुमारे बारा वाजता आकाश अचानक गडगडू लागलं, विजा कडाडू लागल्या आणि काही क्षणांतच जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त झालेल्या पनवेलकरांसाठी हा पाऊस एक सुखद गारवा घेऊन आला. गेल्या […]
इनरव्हील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय महिला संस्था आहे या संस्थेमार्फत समाजातील वेगवेगळ्या स्तरातील महिला एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीतून अनेक वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवितात .
असाच इनरव्हिल मार्फत दरवर्षी राबविला जाणारा उपक्रम म्हणजे ” हॅपी स्कुल ” . या उपक्रमाअंतर्गत क्लब मार्फत आपल्या जवळच्या परिसरातील जिल्हा परिषदेची एखादी गरजु शाळा निवडून तेथे त्या शाळेला आवश्यक असणाऱ्या बाबींची स्वनिधीतून पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो . असाच एक हॅपी स्कुल बनविण्याचा उपक्रम इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या मार्फत नानोशी […]
*अवकाळी पावसाचा फटका; काही ठिकणी लागल्या आगीसह वृक्ष पडले उन्मळून*
पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल मध्ये अचानकपणे मंगळवारी रात्री तसेच बुधवारी धुपरी अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाचा फटका शहरी भागासह ग्रामीण भागाला बसून काही ठिकाणी आगी लागण्याचे प्रकार तर काही ठिकाणी मोठं मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. आज करंजाडे ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सर्वर बॉक्सला आग लागली होती याची माहिती […]
माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण
पनवेल(प्रतिनिधी)किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालय पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. सन १९९३ साली १० वी पास झाल्यानंतर आय टी आय ला प्रवेश घेतला तीन वर्ष आय टी आय च प्रशिक्षण पूर्ण करून लगेचच सन १९९६ साली आर्मी मध्ये भरती झाले. आणि सन २०१३ साली १६ […]
खारघर पोलीस ठाणे मध्ये दर्शनी भागात शासकीय सेवांचे फलक; आवारात फुलपाखरु बाग
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः खारघर पोलीस ठाणे मध्ये येणार्या नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि शासकीय सेवांची माहिती सहजपणे मिळावी, या उद्देशाने लावण्यात आलेले शासकीय सेवांचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्येक पोलीस ठाणे नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र असून, सार्वजनिक कायदा-सुव्यवस्था राखणारे तसेच गुन्ह्यांचा तपास करुन नागरिकांना मदत करणारे महत्वाचे ठिकाण आहे. दरम्यान, खारघर पोलीस ठाणे […]
बांठिया विद्यालयात ’मेहफिल ए सुखन’ काव्य गजल संमेलन संपन्न
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः नवीन पनवेल येथील के. आ. बांठिया विद्यालय सभागृहात 3 मे रोजी मेहफिल ए सुखन काव्य गजल संमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ’ती माणसं गेली कुठे ?’ या पुस्तकातील कविवर्य खावर यांच्या जीवनावरील लेखाचे अभिवाचन निलीमा काटके यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सादर केले. या कार्यक्रमात ललित कला कोकण साहित्य रत्न पुरस्कार ललित […]
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
पनवेल: राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिरते लोकन्यायालय आणि कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 24 मार्च रोजी नेरे येथे फिरते लोकन्यायालय, तर 25 मार्च रोजी ग्रामपंचायत करंजाडे येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर पार पडले. या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ पनवेल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून सर्व […]
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
पनवेल तालुक्यातील गव्हाण वडघर जि.परिषद विभागातील सर्व पदाधिकारी यांची संघटना बांधणीसाठी महत्वाची बैठक गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता त्रिवेणी धाम मंदिर गवळी वाडा सेक्टर ३ करंजाडे पनवेल येथे संपन्न झाली. प्रथम जिल्हा प्रमुख श्री अतुलशेठ भगत साहेब दीप प्रज्वलित करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून सभा सुरू […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नविन पनवेल शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वात दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025 साजरी करण्यात आली. महिलांसाठी हळदीकुंकू आणि होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,युवासेना […]
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे. यासाठी सातत्याने परिसरात हिंदु सण, उत्सव सर्वजण एकत्रित येवून मोठ्या उत्साहात साजरा करतात. हेच या मंडळाचे वैशिष्ट्य असल्याचे मत मा.नगरसेवक व रायगड भूषण, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश गुडेकर यांनी बक्षिस समारंभ कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास डॉ.अजिंक्य […]