4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर): पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे आली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सायली सरक यांनी हा अभिनव प्रस्ताव मांडला असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल या भागांमध्ये दिवसेंदिवस […]
*नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये लिव्हर क्लिनिकचा शुभारंभ*
4kNews दि. 18 यकृतासंबंधीत आजारांचे वेळीच निदान व व्यवस्थापनासाठी हॉस्पिटलचा पुढाकार *नवी मुंबई :* फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस तसेच मद्यपानामुळे यकृताचे होणारे नुकसान आणि मेटाबॉलिक लिव्हर डिसॲार्डर यांसारख्या लिव्हरशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलने पुढाकार घेत नवी मुंबईत लिव्हर क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकद्वारे लिव्हर आजारांचे वेळीच निदान, उपचार […]
रायगड हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निष्काळजीमुळे १६ वर्षीय रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू; २०२४ चे प्रकरण- चार डॉक्टर व हॉस्पिटल व्यवस्थापन आरोपी
4kNews दि. 10पनवेल (प्रतिनिधी) नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणी कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्चच्या चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपासाच्या आधारे हॉस्पिटल व्यवस्थापनाचे डॉ. नंदकुमार बादवराव तासगावकर, यादवराव हिरप्पा कांबळे, वंदना नंदकुमार तासगावकर, डॉ. शशिकांत रामचंद्र गंगावणे व चंद्रशेखर सिताराम सुळगावकर यांच्यावर जबाबदारी निश्चित करून या गुन्ह्यात […]
पनवेलमध्ये ‘खुशरंग’ संगीत महोत्सव दिमाखात संपन्न; रसिक मंत्रमुग्ध
4kNews दि. 10पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘खुशरंग’ संगीत महोत्सव शेकडो संगीत रसिकांच्या साक्षीने आणि उत्स्फूर्त प्रतिसादात मोठ्या दिमाखात पार पडला. मार्केट यार्ड येथील सभागृहात सायंकाळपासूनच रसिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. शास्त्रीय गायन, भजन आणि कथक नृत्य यांचा सुरेल संगम अनुभवताना […]
*मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कॉक्लियर इम्प्लांट क्लिनिकचा शुभारंभ*
4kNews कामोठे दि. 31*नवी मुंबई:* श्रवणदोषाचे वेळीच निदान आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी *मेडिकव्हर हॉस्पिटलने विशेष कॉक्लियर इम्प्लांट क्लिनिक सुरू केले आहे. हा उपक्रम जन्मजात दोषामुळे बोलू न शकणाऱ्या मुलांसाठी, तसेच ज्या प्रौढांना श्रवणयंत्रांचाही फायदा होत नाही त्यांच्यासाठी प्रभावी उपचार प्रदान करणार आहे,* ज्यामुळे त्यांना त्यांची श्रवणक्षमता आणि संवाद कौशल्ये सुधारण्यास नक्कीच मदत होईल. प्रगत निदान […]
लोना इंडस्ट्रीज कामगार संघर्षाला सकारात्मक वळण
4kNews कामोठे दि. 31 पनवेल (वार्ताहर ):रसायनी येथील लोना इंडस्ट्रीज लि. मधील कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्काच्या लढ्याला अखेर सकारात्मक दिशा मिळाली असून, कंपनी व्यवस्थापनाने एक महिन्याच्या आत ठोस निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलनासह आत्मदहनाचा इशारा देत कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी व्यवस्थापनावर तीव्र दबाव कायम ठेवला आहे. […]
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
4kNews दि. 27 *नवी मुंबई :* वाढत्या ॲलर्जीच्या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून न्यूईरा हॉस्पिटलने नवी मुंबईत अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू केले आहे. या क्लिनिकअंतर्गत रुग्णांसाठी एक विशेष ‘ॲलर्जी पॅकेज’तयार करण्यात आले असून,यातंर्गत एकाच पॅनेलमध्ये तब्बल १५० ॲलर्जन्सची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे कमी खर्चात अचूक निदान आणि प्रभावी उपचार व्यवस्थापन शक्य होणार आहे. […]
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
पनवेल, दि. 27( वार्ताहर ) : महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले . स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने चवदार तळे महाड येथे 99 वा क्रांती दिन संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष […]
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
4kNews पनवेल दि. 27 (वार्ताहर) : इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबने पनवेल येथील गुरुलिंगेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेत आवश्यक सुविधा सुधारण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने ‘हॅपी स्कूल प्रोजेक्ट इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबने आयोजन केले.बहुतेक विद्यार्थी जवळच्या झोपडपट्ट्या आणि रेड-लाइट भागांमधून येतात,जिथे जागरूकता आणि पाठिंब्याच्या अभावामुळे शिक्षणाची संधी अनेकदा मर्यादित असते.हे […]
पनवेलमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी
4kNews पनवेल (प्रतिनिधी) भारताचे माजी पंतप्रधान, थोर राजनेते, कुशल वक्ते व कवीहृदय व्यक्तिमत्त्व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, कर्जतचे […]
