नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता

राज्यातील विधानसभा निकालानंतर 8 दिवस उलटूनही सरकार स्थापन झालेले नाही. भाजप महायुतीला 237 जागांचे बहुमत मिळाले असून भाजपने 132, शिंदे गटाने 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लांबला असला, तरी शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून देवेंद्र फडणवीस […]

मनसेला ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेला ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी ही माहिती दिली. जाधव यांनी पत्रात नमूद केले की, “पराभवाची जबाबदारी घेत मी राजीनामा देत आहे. काम करताना कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमस्व.” त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेसाठी […]

विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा

पनवेल (प्रतिनिधी) बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा गुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी ३. ३० वाजता ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.  नवी, मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई तसेच राज्यातील […]

राज्यस्तरीय ११ व्या ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन

पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल […]

सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभाग घ्यावा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) जनतेच्या साक्षीने राज्यात आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळावे आहे, आता पक्षवाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटन पर्व २०२४ सदस्यता अभियान आयोजित करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने नियोजनाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या […]

मृतांना 10 लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ शिवशाही बस उलटली, ज्यात 7-8 प्रवासी मृत्यूमुखी पडले, आणखी 5-7 मृतदेह बसमध्ये अडकल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी मृतांना 10 लाखांची मदत दिल्याचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत जखर्मीना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले.

चोरीच्या गुन्ह्याचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या एका मोलकरणीला अटक केली

चोरीच्या गुन्ह्याचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या एका मोलकरणीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. वनिता उर्फ आशा शैलेंद्र गायकवाड असे या मोलकरीणचे नाव आहे . वनिता ही श्रीमंतांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करता करता एका आठवड्यात घरातील मौल्यवान वस्तु, रोकड चोरी करून पसार होते. वनिता हिच्यावर मुंबई, ठाणे, नवीमुंबई ५० पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची […]

ट्रेलरला धडकून कार चालकाचा मृत्यु

रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला कारची धडक बसली. या अपघातात कारचालक याचा मृत्यू तर चौघे जखमी झाले. आकाश गणपत माढा (वय २६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे . हा अपघात सायन-पनवेल मार्गावर कळंबोली येथे पहाटे झाला. याप्रकरणी कळंबोली पोलिसानी रस्त्यावर निष्काळजीपणे ट्रेलर उभा करून ठेवणारा चालक हरिप्रसाद शेट्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनुराग चौधरी (वय […]

१. ६४ हजारांची फसवणूक

बँकेचे अॅप डाऊनलोड केल्यास सर्व्हिस कर कमी लागेल असे खोटे सांगून क्रेडिट कार्डवरून अनधिकृत व्यवहार करून एक लाख ६४ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल गुरव हे कामोठे, सेक्टर सहा येथे राहत असून २० नोव्हेंबर रोजी त्यांना एक फोन आला आणि बँकेच्या क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असून, क्रेडिट […]

वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून लुबाडले

नवीन पनवेल येथील एका ७१ वर्षीय महिलेला बाकड्यावर बसवून बोलण्यात गुंतवून सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची गळ्यातील माळ काढून घेतल्याची घटना येथे घडली. खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदा पारकर (नवीन पनवेल, सेक्टर १) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. २६ नोव्हेंबर रोजी त्या भाजी आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या, महादेव मंदिराकडे जात असताना एक […]

Back To Top