नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Navimumbainternationlairport

रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू

4kNews कामोठे पनवेल, दि.20 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील मोठे भिंगार गावाजवळ एका अनोळखी इसमाला तेथून जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून झालेल्या दुर्घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. सदर अनोळखी इसम पुरुष जातीचा असून अंदाजे वय 35 आहे. त्याला धावत्या रेल्वेची धडक बसल्याने त्याच्या शरिराची दोन तुकडे होवून […]

‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘

4kNews कामोठे दि. 12पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, थोर दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. १३) सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकनेते […]

पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !

4kNews कामोठे पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल बस स्थानक परिसरात महाराजा स्वीटस कॉर्नरसमोर उड्डाणपूलाखाली रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर चहाच्या टपऱ्या आणि दुकाने रात्रभर सुरू राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या टपऱ्यांवर प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सिगारेटची राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची माहिती माध्यमांमधून जाहीर झाल्यानंतर रायगड झोन 1 […]

विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक

4kNews कामोठे पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल परिसरासह प्रभाग 14 मधील विजेच्या समस्या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कार्यालयात धडक देवून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी स्थानिक नगरसेवक केतन भगत, लतिफ शेख, नगरसेविका कु.आर्या प्रवीण जाधव, मनिषा म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण जाधव, अनंत म्हात्रे, कडू, मयुरेश पाटील यांनी वीज वितरण कंपनीचे […]

गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

4kNews कामोठे पनवेल, दि. 12(संजय कदम) ः तब्बल दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. करण नामदेव पाटील (राहणार फडके पाडा, शिळफाटा ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. 11 एप्रिल रोजी पनवेल तालुका पोलिसांना चिंचवली जवळील पनवेल दुन्द्रे  रस्त्याच्या वनविभागाच्या जागेत झुडपामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. […]

*ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर* यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वारंवार खंडित होणाऱ्या *वीजपुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक* पार पडली.

4kNews कामोठे दि. 12पनवेल   *ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर* यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वारंवार खंडित होणाऱ्या *वीजपुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक* पार पडली. या बैठकीस *मा. आमदार प्रशांतदादा ठाकूर, मा. आमदारजी महेश बालदी,* मा. महापौर नितीनजी पाटील, मा. उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम तसेच माझ्यासमवेत नगरसेवक डॉ. अरुण भगत तसेच इतर मंडळ अध्यक्ष […]

*दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया हनुमान करमेलकर यांची बिनविरोध निवड*

4kNews कामोठे दि. 12 *सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापचा झेंडा कायम, गावात जल्लोष**पनवेल/प्रतिनिधी:* दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आधीचे उपसरपंच महेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आज विशेष निवडणूक घेण्यात आली होती. दुंदरे ग्रामपंचायतीचे लोकप्रिय सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि […]

सिडकोचा कारभार मोगलाई पद्धतीचा परंतु देवाभाऊंच्या राज्यात हे चालू देणार नाही ः आ.विक्रांत पाटील

4kNews कामोठे पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः सध्या सुरू असलेला सिडकोचा कारभार हा मनमानी व मोगलाई पद्धतीचा असून महायुतीच्या देवाभाऊंच्या राज्यात हे चालू देणार नाही, सिडकोच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी धारेवर धरण्यात येईल व सर्वसामान्यांचे प्रश्न कोणत्याही परिस्थितीत धसास लावू असा ठाम निर्धार आज पनवेल येथे घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेमध्ये आ.विक्रांत पाटील यांनी केला.  या पत्रकार परिषदेमध्ये आ.विक्रांत […]

युनिव्हर्सल ग्रुप पनवेल यांच्या वतीने अनोखा दुहेरी कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थांचा सत्कार आणि ‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’ एक प्रबोधनात्मक नाटकाचे आयोजन
‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’ नाटक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे युनिव्हर्सल ग्रुपच्या तर्फे पनवेल मध्ये आयोजन

4kNews कामोठे पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः युनिव्हर्सल ग्रुप पनवेल- रायगड तर्फे पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये बौद्ध समाजातील इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व समाजप्रबोधनाचा भाग म्हणून ‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’ या प्रबोधनात्मक नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या तत्त्वावर चालणाऱ्या युनिव्हर्सल ग्रुपच्या उपक्रमाला पनवेल मधील जनतेने उदंड […]

कळंबोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; घरफोडी प्रकरणाचा छडा लावून १३.७० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

4kNews कामोठे पनवेल, दि.12  (वार्ताहर) ः   कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात कळंबोली पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोथे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली त्या वेळी गुन्हे प्रकटीकरण प्रमुख PSI अमोल चौगुले सहकारी पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र गायकवाड, निलेश सोळुंखे,शरद मराठे […]

Back To Top