Tag: #Kamothe #Panvel

१०३ निविदांमध्ये ६५ ते ७० टक्के कमी दराने निविदाअत्यल्प दरामुळे कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; भरत पाटील यांची सखोल चौकशीची मागणी

4kNews कामोठे दि 10 पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या १०३ कामांच्या निविदांमध्ये अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा तब्बल ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा प्राप्त झाल्याची बाब समोर आली आहे. एवढ्या कमी दरात कामे करताना साहित्याचा दर्जा, मजुरी, यंत्रसामग्री, वाहतूक व इतर खर्च कसा भागविला जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी याप्रकरणी महापालिका […]

तंत्रज्ञान आणि विश्वासामुळे NBFC-HFC क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा : RBI उपराज्यपाल एस. सी. मुर्मू

4kNews कामोठे मुंबई, दि. 10 (अजित मोहिते) : भारताची आर्थिक वाढ, वाढता शहरीकरण, डिजिटल परिवर्तन आणि लोकसंख्यात्मक लाभामुळे बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) व गृहनिर्माण वित्त कंपन्यांसमोर (HFC) मोठ्या संधी आहेत. या क्षेत्राचा पुढील टप्प्यातील विकास तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या विश्वासावर अवलंबून राहील, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) उपराज्यपाल एस. सी. मुर्मू यांनी सांगितले.  ‘NBFCs, HFCs and […]

कर्करोग उपचारासाठी केवळ वय हा निकष नसावा
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कर्करोग चिकित्सा क्लिनिक सुरू

4kNews कामोठे नवी मुंबई, दि. 10 सप्टेंबर (अजित मोहिते) : कर्करोगावरील उपचार ठरवताना रुग्णाचे केवळ वय न पाहता त्याची शारीरिक क्षमता, स्वावलंबन, पोषणस्थिती, मानसिक आरोग्य, इतर आजार, औषधांचा भार आणि कौटुंबिक आधार यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील तज्ज्ञांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांमध्ये कर्करोग उपचारांची वाढती गरज लक्षात घेऊन अपोलो हॉस्पिटल्सने […]

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार

4kNews कामोठे उरण, दि. ९ (विठ्ठल ममताबादे) : “महेंद्रशेठ घरत हे मनाने सच्चे आणि आश्वासक नेतृत्व आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेसला निश्चितच होईल. त्यांना योग्य संधी देणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे,” असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.  उरण तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. ८) […]

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न

4kNews कामोठे उरण, दि.  9(विठ्ठल ममताबादे) : ‘नाते मातीशी’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून खान्देश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने आयोजित ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. करंजा रोड येथील भारती बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला खान्देशी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  महोत्सवात सत्यनारायण महापूजा, स्नेहमेळावा, सामूहिक भोजन तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. खान्देशातून सेवामुक्त […]

विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना

4kNews कामोठे उरण, दि. 9(विठ्ठल ममताबादे) : विंधणे कोळीवाडा येथे ‘एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित, विंधणे’ या संस्थेचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. ६) कुलदैवत मंदिरासमोरील पटांगणात उत्साहात पार पडला. स्थानिक पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना व सवलतींचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात […]

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च

4kNews कामोठे गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी संवेदनशील भागांत ‘एरिया डॉमिनेशन’पनवेल, दि. 9 (वार्ताहर) : आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पनवेल शहर पोलिस व राज्य राखीव दलाच्या (RAF) जवानांनी विविध संवेदनशील भागांत रूट मार्च व ‘एरिया डॉमिनेशन’ केले. पनवेल शहर पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला मार्च ५२ बंगला, साईनगर, बंदर रोड, […]

अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’

4kNews कामोठे दि. 9कामोठे : ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात नवी मुंबईचा ‘आगमनाधीश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामोठ्याच्या विघ्नहर्ताचे भव्य महाआगमन उत्साहात पार पडले. अटल सेतूवरून कामोठ्याच्या दिशेने निघालेल्या मिरवणुकीत हजारो गणेशभक्त सहभागी झाले.  कामोठ्याचा विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ढोल-ताशा व लेझीम पथकांसह पारंपरिक वेशभूषा आणि विविध आकर्षक […]

माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर

4kNews कामोठे पनवेल, दि. 9(वार्ताहर) : माँसाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका प्रगती कैलास पाटील यांच्या पुढाकाराने तळोजा येथे आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  शासकीय आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांना सहज मिळावा, तसेच डिजिटल आरोग्य नोंदणीला चालना मिळावी, या उद्देशाने शिबिर घेण्यात […]

कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक

4kNews कामोठे अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; तातडीने व्यवस्था सुधारण्याची मागणीपनवेल, दि. ९ (वार्ताहर) : कळंबोली परिसरातील अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, याप्रश्नी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिडको प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून […]

Back To Top