नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

तांब्याच्या तारा, ऑइलची चोरी

सेक्टर १७ कळंबोली येथील सबस्टेशनच्या रोहित्रामध्ये असलेल्या तांब्याच्या तारा आणि ऑइलची चोरी केल्याप्रकरणी आरोपी विरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ७५ हजार रुपये किमतीच्या साडेचारशे किलो वजनाच्या तांब्याच्या तारा आणि ५८ हजार ४०० रुपये किमतीचे ७३० लिटर ऑइलची चोरी झाली आहे. त्यामुळे महावितरण चे अधिकारी सतर्क झाले असून, सबस्टेशनमध्ये पूर्णवेळ सुरक्षा अधिकारी नेमण्याच्या […]

बस उलटली, 7 जणांचा जाग्यावरच मृत्यू

गोंदीयाच्या सडक अर्जुनीमध्ये महामंडळाची शिवशाही बस उलटल्याची भीषण घटना घडली आहे. खजरी गावाजवळ बसचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खंत व्यक्त केली आहे, प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना एकनाथ शिंदेंनी […]

तावडेंच्या एन्ट्रीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा सस्पेन्स

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची दिल्लीत बैठक झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपद व मराठा मतांच्या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी तावडेंकडून मराठा समाजाची भूमिका समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाली, मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिल्यास मतांवर होणाऱ्या परिणामांची गणिते मांडली […]

गळ्यातील चेन हिसकावली

काळ्या रंगाच्या स्कूटीवर आलेल्या दोन इसमांनी ४८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांच्या चेन हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २४ नोव्हेंबर रोजी चेंबूर मुंबई येथील अनुराधा पाठक या भाजीपाला घेण्यासाठी डी. मार्ट परिसरात पायी गेल्या होत्या. भाजीपाला घेऊन परत येत असताना सिडको बिल्डिंगच्या समोरील मुख्य रस्त्यावर सेवन इलेव्हन शॉपच्यासमोर सेक्टर […]

प्रजापती समाज पनवेल यांच्या कडून आमदार साहेबांचे अभिनंदन करण्यात आले

प्रजापती समाज पनवेल यांच्या कडून आमदार साहेबांचे अभिनंदन करण्यात आले…यावेळी समाजाचे अध्यक्ष बन्सीलाल प्रजापती, भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश जी कोळी, चिटणीस अमरीश मोकल, शहर उपाध्यक्ष केदार भगत…तसेच समाजातील जीवाराम प्रजापती, भैरवलाल प्रजापती, मनोहरलाल प्रजापती, ताराराम प्रजापती, बाबुलालजी प्रजापती उपस्तित होते….

अपोलोने सुरु केला भारतातील पहिला लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम

ग्लॉबोकॅन २०२० च्या अहवाला नुसार १.८ दशलक्ष रुग्ण फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यूमुखी नवी मुंबई, २८ नोव्हेंबर २०२४: देशात सध्या फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. वाढत्या फुफ्फुसाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी कर्करोगावर प्रभावीपणे उपचार देणा-या अपोलो कर्करोग केंद्रात आता देशातील पहिला लंगलाइफ स्क्रिनिंग प्रोग्राम सुरु झाला आहे. सध्या देशात आढळून येणा-या एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी ५.९ […]

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार

पनवेल / प्रतिनिधी(4kNews)नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या सार्वत्रिक विधासभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळेस नेत्रदिपक विजय मिळवला आहे.विजयी चौकार लगावलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्र बिंदू असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे या चारही विजयात अतुलनीय नियोजन कौशल्य आहे. या पार्श्वभूमीवर क्रियाशील प्रेस क्लबच्या वतीने, भारतीय जनता […]

पडघे गावात गटार बांधण्याची  जागृती फाऊंडेशन ची मागणी

पनवेल दि २६  /प्रतिनिधी 4kNews पनवेल महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ०२ मधील काही भागात सांड पाणी वाहून जाण्यासाठी गटार नसल्याने येथील नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे . बारमाही या सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने मच्छर,डास, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा  प्रश्न उद्भवला आहे . यामुळे या भागात गटार बांधावे अशी मागणी  जागृती फाऊंडेशन चे  संस्थापक अध्यक्ष […]

सलग चौथ्या दिवशीही अभिनंदनाची रीघ!

पनवेल 4kNews विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन केल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या चार दिवसांपासून आमदार प्रशांत ठाकूर व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागली आहे. त्याचबरोबरीने लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.  पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्रशांत […]

पनवेल शिवसेनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

पनवेल (4kNews) विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारणारे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना पनवेल शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी मिळून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपासून सामान्य शिवसैनिकापर्यंत सर्वांनी युती धर्माचे पालन करत आमदार प्रशांत ठाकूर यांचे निवडणुकीत एकदिलाने काम केले. त्यांच्या विजयानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या ठाकूर यांच्या निवासस्थानी त्यांचा जाहीर सत्कार करत अभिनंदन केले.   यावेळी […]

Back To Top