पनवेल दि.१४ 4News) : रायगड जिल्हा क्षयरोग विभागा मार्फत आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसीय टीबी मुक्त अभियान संपुर्ण रायगड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या अभियानात सामाजिक दायित्वच्या भावनेतून माजी नगरसेवक विकास घरत यांनी क्षयरोग निदान झालेल्या कामोठेमधील ५ व्यक्तींना पोषणासाठी सहाय्य दिले. या अभियानात अतिजोखमीच्या व्यक्तींची नॅट आणि एक्स रेच्या मदतीने क्षयरोगासाठी […]
श्री दत्त जयंती सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी दिल्या भेटी
पनवेल, दि.14 (4kNews) ः आज श्री दत्त जयंती सोहळा पनवेल तालुक्यात मोठ्या धार्मिकतेने तसेच विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न होत आहे. या सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी भेटी देवून आशिर्वाद घेतले आहे. खारघर, बेलपाडा, रोडपाली, कळंबोली आदींसह ग्रामीण भागातील विविध श्री दत्त जयंती सोहळ्याला जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये […]
तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा; कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी
पनवेल (4kNews) तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे सदरचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात त्यांनी निवेदनही आयुक्तांना दिले आहे. पनवेल […]
नवी मुंबईत 25 ठिकाणी पोलिसांची छापेमारी ; 16 नायजेरियन नागरिकांना घेतले ताब्यात, 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसराससह नवी मुंबईत 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहे. याप्रकरणी 16 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यावर छापा टाकून थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये पुरवले जाणारे […]
दिघोडे ग्रामस्थ मंडळाच्या व्यवस्थापनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे आयोजित करण्यात आला होता.
(4kNews) दिघोडे ग्रामस्थ मंडळाच्या व्यवस्थापनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे आयोजित करण्यात आला होता. श्री समर्थ गोविंदबाबा वहाळकर यांच्या हस्ते मंगल कलश पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. श्री १००८ महामंडळेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून कीर्तनाचा आस्वाद घेतला. […]
बालाजी सिम्फोनी सुरक्षा बैठक खांदेश्वर पोलिसांच्या मार्फत संपन्न
पनवेल, दि.13 (4kNews कामोठे ) ः खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सुकापूर येथील बालाजी सिम्फोनी सोसायटीमध्ये सुरक्षा बैठक वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी सपोनि बळवंत पोलीस पाटील यांनी उपस्थित सोसायटीमधील रहिवाशांना व पदाधिकार्यांना सुरक्षितता जनजागृती बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने सायबर सुरक्षा,डायला 1930, 112, नवी मुंबई वॉट्सअँप चायनल, सायबर सेफ नवी मुंबई, […]
कुर्ला बेस्ट बस अपघात, ड्रायव्हर खिडकीतून उडी मारून फरार
मुंबईच्या कुर्ला येथे बेस्ट बस अपघात झाला. आता त्या बसमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यात अपघातानंतर बस ड्रायव्हर संजय मोरे बसच्या खिडकीतून उडी मारून पळून जाताना दिसत आहे. त्याने बसच्या मागच्या दारातून उडी मारली, तेव्हा बसमधील प्रवासी घाबरले आणि बसच्या आतील बाजूचे खांब पकडून बसमध्ये नियंत्रण मिळविण्यासाठी ते एकमेकांचे हात पकडून बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत […]
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे आज (दि. १२) केली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदनही दिले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल (प्रतिनिधी)4kNews पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील नेवाळी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १२) झाले. विद्यार्थ्यांना देशी खेळांसाठी उत्तेजन आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बेचकीने नेम धरणे, […]
पनवेल येथील निलीमाताई पाटील आदर्श क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, सन्मान रत्न पुरस्काराने सन्मानित
पनवेल, दि.12 (वार्ताहर) 4kNewsः तालुक्यातील टेंभोडे येथे राहणार्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच वर्चस्व युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, नारीशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, जनहित सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा व शिव स्वराज्य संस्था रायगडच्या महिला संपर्कप्रमुख निलीमाताई संदीप पाटील यांना नुकत्याच पार पडलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे स्वारगेट येथे मोठ्या दिमाखात सोहळा पार […]