4kNews कामोठे पनवेल दि. 10 ( वार्ताहर ) :पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाची बढती देण्यात आली आहे . जितेंद्र विठ्ठल म्हात्रे हे १/०१/१९९३ साली पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले .प्रथम त्यांनी रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कामकाज पहिले त्यानंतर त्याची बदली […]
खानावळे-ठोंबरेवाडी एकता संघ संचलित माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटनेचे थाटात उद्घाटन
4kNews दि. 10 कामोठे पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल तालुक्यातील संघटनेचे कार्यालय गोदरेज सिटी ठोंबरेवाडी, खानावळे येथे ‘महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटनेचे’ मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. अशोक हितेंद्र निकम (जिल्हाध्यक्ष नवी मुंबई व रायगड जिल्हा) यांच्या मार्गदर्शनाखाली खानावळे-ठोंबरेवाडी एकता संघ यांच्या वतीने या शाखेची स्थापना करण्यात आली असून उद्घाटन गोदरेजचे रचीत […]
प्रामाणिकपणाचा आदर्श; वाल्मिकी समाजातील अन्नु पारचे यांचा गौरव
4kNews कामोठे पनवेल : दि. 10 प्रभाग क्र. १८ मधील वाल्मिकी नगर येथे राहणाऱ्या व वाल्मिकी समाजातील श्रीमती अन्नु अशोक पारचे यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाऊसकीपिंगचे काम करत असताना त्यांना रोख रक्कम व सुमारे २ लाख रुपयांचा चेक सापडला. कोणताही मोह न बाळगता त्यांनी तो चेक व रक्कम तात्काळ […]
पनवेलमध्ये साडेनऊ लाखांची वीज चोरी उघड; एकावर गुन्हा दाखल
4kNews कामोठे पनवेल : तालुक्यातील अजिवली परिसरात वीज चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, तब्बल ९ लाख ५० हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे वीज वितरण यंत्रणा आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजिवली येथील एका गाळ्यातून बेकायदेशीर पद्धतीने वीज वापर सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी […]
सेनेची बांधणी अधिक मजबूत करण्याासाठी पनवेलमध्ये बैठक संपन्न
4kNews कामोठे पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः युवासेना सचिव तथा मावळ लोकसभा युवासेना संपर्कप्रमुख, गटनेते, नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली तर पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख नगरसेवक प्रथमेश सोमण तथा उपजिल्हाप्रमुख परेशभाई पाटील यांच्या नेतृत्वात एस. आय. आर. संबंधी बी. एल. ए. नेमणुका व इतर संघटनात्मक विषयांवर प्रमुख पदाधिकार्यांची पनवेल मध्ये यशस्वी बैठक संपन्न […]
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न
4kNews कामोठे पनवेल दि. ०6 (वार्ताहर) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न करण्यात आला. या महोत्सवाची सुरुवात पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीने अतिशय जल्लोषामध्ये व हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली . सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. […]
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष बालसंस्कार वर्ग संपन्न
पनवेल दि. ०6 (वार्ताहर) : शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष (२०२६-२७) निमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, लाईन आळी येथे बालसंस्कार वर्ग संपन्न झाले. याचा कालावधी : १० दिवस असा होता. यात वयोगट : ३ ते १३ वर्ष मुले सहभागी झाले होते. यामध्ये श्लोक चित्रकला, मंत्रपठण, स्तोत्र, प्राणायाम सुर्यनमस्कार खेळ, […]
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती
पनवेल, दि. 6(संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे कृष्णा धामापूरकर यांना बढती मिळून ते पोलीस निरीक्षकपदी नियुक्त झाले असून त्यांना नवी मुंबई विमानतळ (इमिग्रेशन) या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे कृष्णा धामापूरकर यांना आज बढती मिळून पोलीस निरीक्षक […]
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %
4kNews कामोठे पनवेल ,दि. 6( वार्ताहर ) : कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित दोन्ही शाळांचा १२ वी चा निकाल १०० % लागला आहे . कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित दि इलाईटपब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व बीके पाटील ज्युनिअर कॉलेज (बबन दादा पाटील ज्युनिअर कॉलेजचा) शिक्षण 2025 – 26 […]
बंबई पाडा परिसरात आढळला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह
पनवेल ,दि. 6( वार्ताहर ) : तालुक्यातील बंबई पाडा परिसरात रविवारी सकाळी एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात कारणावरून महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंबई पाडा येथील रहिवाशांना सकाळच्या सुमारास संबंधित महिला घरात मृतावस्थेत आढळून आली. […]
