माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या तक्रारींमुळे ज्युपिटर रुग्णालयात तपासणीसाठी रवाना झाले आहेत . गळ्याच्या त्रासामुळे त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजते. यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता, त्यामुळे त्यांची पुढील तपासणी करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवभोजन योजना बंद होणार?
कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली शिवभोजन योजना निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या राज्यातील 21 शिवभोजन केंद्रे निधीअभावी अडचणीत आली आहेत. सामान्य लोकांसाठी उपयुक्त ठरलेली ही योजना बंद होणार का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. योजनेच्च्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार […]
एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल
एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल त्यातून अनेक संदेश जातील, भाजपा आपलेच म्हणणे खरे करते, मित्रपक्षाला मान देत नाही आणि मित्रपक्षाला वापरून सोडून देते. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवली होती आणि याला भरपूर यश आले तर त्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी आणि त्याच्या सहकार्यानी […]
अजित पवारांचा ‘सोनेरी काळ’ सुरू
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अजित पवारांचा ‘सोनेरी काळ’ सुरू झाल्याचे दिसत आहे. शरद पवार गटातील माजी आमदारांनंतर आता शिवसेना (ठाकरे गट) नेते अपूर्व हिरे यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली आहे. निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या गटात गेलेल्या हिरे यांच्या घरवापसीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, शरद पवार गटातील राहुल जगताप व मानसिंग नाईक […]
एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघडली
एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाल्याने सोमवारी सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. शिवसेना आमदारांची बैठकही पुढे ढकलण्यात आली. शिंदे ठाण्यात राहून आराम करणार असून दिल्लीतील भाजप बैठकीला त्यांचा सहभाग शक्य नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, 5 डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी अपेक्षित असला तरी मुख्यमंत्री आणि मंत्रिपदे याबाबत अजून निर्णय […]
मनसेतील दोन जिल्हाप्रमुखांमधील वाद राज ठाकरेंपर्यंत
मनसेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये निर्माण झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. अविनाश जाधव यांनी समीर मोर यांच्या भावाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मनसेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हा विषय थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या दरबारात पोहोचला आहे. आता या प्रकरणावर राज ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शर्वरी प्रमोद कांबळे हीची कोणी चौकशी साठी आल्यास त्यांना गोवंडी स्टेशन येथे पाठवावे.
नवी ्मुंबई (4kNews) कामोठे सेक्टर 12 येथे राहणारी शर्वरी प्रमोद कांबळे वय 8 वर्षे हि सध्या गोवंडी रेल्वे स्टेशन येथे भेटली असून ती फक्त्त कामोठे सेक्टर 12 एवढंच सांगते कोणी चौकशी साठी आल्यास त्यांना गोवंडी स्टेशन येथे पाठवावे.
ईव्हीएम हॅकिंगचा आरोपः अमेरिकेतील व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकेतील व्यक्तीविरोधात मुंबई सायबर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सय्यद शुजा असे या व्यवतीचे नाव आहे. शुजाच्या दाव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम हॅकिंगबाबत राज्य आणि देशभर […]
आई-बहीणीवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंड, मोठा निर्णय
शिव्या देणं हे अपमानास्पद वागणूक देण्यासारखे आहे. भांडणात शिव्या दिल्यास लहान मुलांवर देखील याचा वाईट परिणाम होतो. यामुळेच महाराष्ट्रातील सौंदाळा गावाने अपशब्द वापरणारे तसेच आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात नवा नियम लागू केला आहे. येथील सरपंच शरद अरगडे यांनी ग्रामसभेत याबाबत ठराव पारित केलाय. या नियमानुसार आता सौंदाळ गावात शिवीगाळ करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड भरावा लागणार […]
शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता
राज्यातील विधानसभा निकालानंतर 8 दिवस उलटूनही सरकार स्थापन झालेले नाही. भाजप महायुतीला 237 जागांचे बहुमत मिळाले असून भाजपने 132, शिंदे गटाने 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लांबला असला, तरी शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून देवेंद्र फडणवीस […]
